तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ...
ओव्हरटेकच्या नादात क्रुझर उलटून झालेल्या अपघातात १३ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येलगुंडा-मालखेड गावादरम्यान घडली. जखमी बोरीअरब (ता.दारव्हा) येथील असून ते अंत्यसंस्काराला अमरावती येथे जात होते. ...
शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून आणखी एका शिक्षक नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी सात शिक्षक नेत्यांच्या मुलाखती होणार आहे. मात्र तत्पूर्वीच या नेत्यांनी एकमेकांचा पत्ता कट करण्यासाठी चिखलफेक सुरू केली आहे. ...
तालुक्यातील कुरई येथील महिलांनी दारू पकडल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या नातलगांनी दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या हस्तकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. ...
बचतीच्या माध्यमातून एक नवा इतिहास घडविणाऱ्या महिलांच्या कन्यारत्नांना थेट नोकरी देण्याचा प्रयोग राज्यात राबविला जाणार आहे. पहिल्या प्रयोगाची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे. ...
तालुक्यातील कलगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिन्यातून केवळ दोनदाच पाणी येत आहे. डिसेंबर महिना संपताच गावात पाणीटंचाईने कहर केला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. ...
उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवरील आमंत्रित शिक्षक सदस्याची निवड करण्यात आली. मधुकर काठोळे यांची निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आदेश काढले. ...