पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 21:29 IST2025-05-21T21:26:42+5:302025-05-21T21:29:51+5:30
IAS Officer Transfer in maharashtra: पुणे महापालिका आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त पदी नव्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
IAS transfer in maharashtra today: राज्य सरकारने राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात महत्त्वाच्या पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम, तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी जिंतेंद्र पापळकर यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयएएस अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शीतल तेली- उगले यांची क्रीडा आणि युवक कल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली
धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र एस. पापळकर यांची छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सी.के. डांगे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिव कार्यालयात सचिव पदी बदली करण्यात आली आहे.
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची मुंबईत बदली
अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर नवीन नगर सिडकोच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
वाचा >>डॉ. राजेंद्र भोसले निवृत्त होणार, पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम
पुण्याचे भूमी अभिलेख अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची अहिल्यानगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.