शाळेत अडगळीत पडलेल्या कपाटातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची पाहता-पाहता मैत्री झाली. दररोज फावल्या वेळात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वाचनालयात बसून विविध प्रकारची पुस्तकं चाळत बसतात. ही किमया बाभूळगाव तालुक्याच्या सावर येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. ...
कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे. ...
गुन्हेगारी टोळ्यांचे शहर म्हणून यवतमाळची कुप्रसिद्धी आहे. वरदहस्तातून यवतमाळातील डॉनचा खून झाला. या खुनापाठोपाठ अनेक महत्वाकांक्षा असलेले भाई सक्रिय झाले आहेत. अल्पवयीन मुलांना नादी लावून त्यांच्या जीवावर आपली दहशत निर्माण करण्याचा गेम सुरू आहे. ...
तहान लागल्यावर विहीर खोदणे, हा प्रकार प्रशासन नेहमीच करते. मात्र आग लागल्यावर पाणी शोधणे हाही प्रकार आता केला जात आहे. ४५ अंशांपर्यंत चाललेल्या तापमानामुळे इमारतींमध्ये आगी लागण्याची दाट शक्यता आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून भडकलेले तापमान रविवारीही ४५ अंशाच्या पलिकडे गेले होते. वाढत्या तापमानामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी दुपारी प्रचंड तापमानामुळे दिग्रस येथे उभ्या आॅटोरिक्षाने पेट घेतला. ...
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या शिंगाडा तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना ‘लोकमत’ने ही बाब वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. त्याची दखल घेत आता या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. लवकरच हा तलाव कात टाकणार आहे. ...
उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत. ...
जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले. ...