दारात कुत्र्याने घाण करू नये, म्हणून यवतमाळकरांनी दारापुढे लाल बाटली ठेवली. मात्र नेमक्या आशाच बाटलीवर कुत्रा लघुशंका करीत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, एका जानकार डॉक्टरने तो फॉरवर्ड केल्याने यवतमाळकरांच्या अंधश्रद्धेचा ...
संतोष शंकर डांगे (१४) रा. लासीना ता. जि. हिंगोली असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता. मात्र सायंकाळी घरी परतला नाही. त्याचे वडील व नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र संतोष कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्या ...
इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य कर ...
खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन ...
गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश केला असता धक्कादायक चित्र ...
महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. एवढ्या निधीची तरतूद महाविकास आघाडीचे सरकार नेमकी कुठून करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण राज्याचे खर्चाचे वार्षिक बजेटच ५५ हजार कोटींचे आहे. अश ...
मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेप ...
२५ मार्च रोजी सी-१ व सी-३ या दोन बछड्यांना कॉलरआयडी लावण्यात आला. यासाठी डेहराडून येथील पराग निगम व डॉ.बिलाल हबीब यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या वाघांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला. यातील सी-३ हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून जुलै महिन्या ...
डिजय जेलगा प्रधान (२४) रा. दशमागिया जि. जाजपूर ओरिसा, आर रविकुमार मोहन (४६) रा. नारायणपूर जि. गंजाम ओरिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये बॅग लिफ्टींगचे गुन्हे करणे हाच यांचा मुख्य रोजगार आह ...