ग्रामपंचायत गाठण्यासाठी आठ किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:12+5:30

मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेपर्यंत बंद असतो.

Eight kilometers journey to reach Gram Panchayat | ग्रामपंचायत गाठण्यासाठी आठ किलोमीटरचा प्रवास

ग्रामपंचायत गाठण्यासाठी आठ किलोमीटरचा प्रवास

Next
ठळक मुद्देनिमगव्हाणची अशीही कहाणी : चिखल तुडवित काढावा लागतो मार्ग

निश्चल गौर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : गावाचे ग्रामपंचायत कार्यालय फारच फार एक-दोन किलोमीटर राहील असा आपला एक अंदाज. मात्र निमगव्हाण (ता.कळंब) या गावातील लोकांना तब्बल आठ किलोमीटर प्रवास करत ग्रामपंचायतीत जावे लागते. यामध्ये व्यक्तिगत त्रास होण्यासोबतच गावाचा विकासही पार लंबा झाला आहे. पावसाळ्यात तर बेहाल असतात. याच काळात विद्यार्थी, शेतकरी आदींना विविध प्रकारचे कागदपत्र मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठावे लागते.
मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेपर्यंत बंद असतो. या काळात ग्रामपंचायत कार्यालयात जायचे झाल्यास निमगव्हाण ते डोंगरखर्डा हे चार किलोमीटर आणि डोंगरखर्डा ते मुसळ हे चार किलोमीटर असे आठ किलोमीटर अंतर पार करावे लागते.
निमगव्हाण गावातील स्वतंत्र ग्रामपंचायत सदस्यही नाही. कोडपाखिंडी या गावातील प्रभाग क्र.२ मधील सदस्यच या गावाचा प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात. रस्त्याच्या प्रश्नासाठी गावकरी आणि सदस्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु लोकांचा आठ किलोमीटर होणारा प्रवास थांबविण्याची तसदी कुणी घेतली नाही. निमगव्हाणला विकासही कधी शिवला नाही. या गावात अनेक समस्या आहेत. याची जाणीव लोकप्रतिनिधींना वारंवार करून देण्यात आली. मात्र कुणीही गांभीर्य दाखविले नाही. ज्या रस्त्यावरून बैलगाडीनेही मार्ग काढता येत नाही तेथून इतर वाहने निघणार कशी हा प्रश्न आहे.

मुसळ-कोडपाखिंडी-निमगव्हाण रस्त्याचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी पाठविण्यात आला. यावर अजून तरी कुठलीही कारवाई झालेली नाही.
- गीताताई पडाळकर,
सरपंच, मुसळ

Web Title: Eight kilometers journey to reach Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.