The upliftment of society in the mind of Saint Ravidas | संत रविदासांच्या विचारात समाजाची उन्नती
संत रविदासांच्या विचारात समाजाची उन्नती

ठळक मुद्देकल्याणी पद्मने : रविदास विचार मंच आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात स्मृती पर्वात व्याख्यान

काशीनाथ लाहोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संत रविदासांच्या समकालीन संतांनी त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले, अनेकांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम, ग्यानी झैलसिंग यांनीही संत रविदासांचे विचार आणि तत्त्वज्ञान समाजाला दिशा देणारे आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत. आम्ही मात्र त्यांचा उपदेश आणि विचारांपासून दूर गेलो. परिणामी आमची सर्व बाजूंनी अधोगतीच झाली. असे मत प्रसिद्ध विचारवंत डॉ. कल्याणीताई पद्मने यांनी व्यक्त केले.
येथील आझाद मैदानातील स्मृतिपर्वात गुरू रविदास विचार मंचच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ‘१५ व्या शतकातील संत रविदासांची जाज्वल्य विचारधारा व आधुनिक काळातील समन्वकीय सामाजिक भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून संध्याताई बांगडे, सुजाता मोकडे, संगीता वानरे, भारतीताई तांडेकर, लता सोनटक्के, कमलताई पतके, उषाताई ठाकरे, वनिताताई झाडे, वर्षाताई डहाके, आशाताई वर्षे, संगीता इंगळे, वैशालीताई बच्छराज, कैवल्याताई कुंभरे, शुभांगी मालखेडे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात देवीदासजी खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि शेषरावजी सूर्यवंशी स्मृतिप्रीत्यर्थ कौटुंबिक सत्कार करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ साहित्यिक व लेखक खुशालराव डवरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यात प्रामुख्याने चंद्रशेखर लहाडके, उत्तमराव इसाळकर, सुनील बांगडे, देवानंद तांडेकर, बळीराम पतके, मायाताई चंदनकर, प्रा. तृष्णा मोकडे यांचा समावेश आहे. संचालन अमर तांडेकर यांनी केले. आभार मोहन लोखंडे यांनी मानले.

‘इस्लाम’ समाज परिवर्तनाचा विचार आहे - वाजित कादरी
यवतमाळ : इस्लाम स्वीकारणारा कोणताही व्यक्ती इतरांचा वैरी असू शकत नाही. प्रेषित महम्मद पैगंबर हे प्रखर मानवतावादी होते. त्यांनी समतेसाठी सतत संघर्ष केला. स्त्रियांचे संरक्षण, त्यांचे हक्क, अधिकार अबाधित ठेवण्यासाठी पवित्र कुराणात उपदेश केले. लोकोपयोगी कार्य करणारे महापुरुष, संतांना इस्लाममध्ये आदरयुक्त भावनेने सन्मान दिला जातो. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता आणि इस्लाममधील समता ही एकच आहे, असे विचार सुप्रसिद्ध विचारवंत व जमात-ए-इस्लामी (हिंद)चे अध्यक्ष वाजित कादरी (औरंगाबाद) यांनी मांडले. जमात-ए-इस्लामी हिंद यवतमाळच्यावतीने आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘भारताच्या बहुजन समाजापुढील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. दीपक शिरभाते होते. मंचावर फारूखभाई, शकीलभाई, डॉ. अब्रार खान, मन्सूर एजाज जोश, शेख मेहबूब आलम, रियाझ सिद्दिकी, झियाउद्दिनभाई, वसीम खान, ज्ञानेश्वर गोरे, कवडूजी नगराळे, विलास काळे, सुनील वासनिक, संजय बोरकर, विश्वास वालदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक काजी निजामुद्दिन, संचालन प्रा. सैयद मोहसीन यांनी केले. आभार सईद चाऊस यांनी मानले.

आजचे व्याख्यान
स्मृती पर्वात ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भटक्या विमुक्त जमातीच्या संयोजनात व्याख्यान होणार आहे. ‘भटके विमुक्त व शासकीय आयोग’ या विषयावर अखिल भारतीय तांडा सुधार समिती नागपूरचे संस्थापक अध्यक्ष नामा बंजारा हे विचार मांडतील. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे अध्यक्षस्थानी राहतील. व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबूसिंग कडेल यांनी केले आहे.

Web Title: The upliftment of society in the mind of Saint Ravidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.