यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यति ...
आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. ...
सेवानिवृत्त एसटी वाहक नामदेव पराते यांच्या घराचे येथील गांधीनगरात बांधकाम सुरू आहे. याठिकाणी सोमवारी बोअर खोदण्यात आली. अवघ्या काही मिनिटात या बोअरला केवळ १७ फुटांवर पाणी लागले. त्याचवेळी किमया घडली ती अशी खोदकामही थांबवावे लागले. बोअरमधून निघणाऱ्या ...
मुळात माणसाने माणसाशी बोलणे हेच खूप आवश्यक आहे. त्यातही बोलताना मायबोलीचा अंगीकार केला तर दुधात साखरच. भाषा टिकली तर, आपण टिकू. नव्हे, भाषा टिकविणे ही आपलेच कर्तव्य आहे. ही जबाबदारी जाणूनच ‘लोकमत’ने ‘मराठीत बोला ना’ हे अत्यावश्यक अभियान सुरू केले आहे ...
शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी ...
भारतीय जनता पक्षातर्फे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळातील धरणे कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उद ...
जिल्हा पोलीस दलात दोन हजार ७७० पोलीस कर्मचारी आहेत. १०३ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. पोलीस उपअधीक्षकाची संख्या दहा आहे. एक हजार ३१६ शासकीय निवासस्थाने उपलब्ध आहेत. मात्र यापैकी राहण्यायोग्य निवासस्थाने केवळ ४६२ इतकी आहे ...
शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र ...
पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने प्रेरित होऊन अर्थने हा रोबोट तयार केला आहे. ...