देऊरवाडीनजीक बस-ट्रॅक्टरचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:19 AM2020-03-07T00:19:06+5:302020-03-07T00:19:37+5:30

एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर व बसची धडक झाली. यात ट्रॅक्टरचा जागीच चुराडा झाला.

Bus-tractor accident near Dewarwadi | देऊरवाडीनजीक बस-ट्रॅक्टरचा अपघात

देऊरवाडीनजीक बस-ट्रॅक्टरचा अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील देऊरवाडी फाट्यावर बस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी तर बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता घडली.
एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर व बसची धडक झाली. यात ट्रॅक्टरचा जागीच चुराडा झाला. बस लगतच्या लोखंडी सुरक्षा कवचावर धडकली. यात ट्रॅक्टरचालक एस.एस. जाधव गंभीर जखमी झाले.
याशिवाय रोहीत भिकम चव्हाण (२२) रा.लाखरायजी व बसमधील प्रवासी रेखा जयसिंग राठोड (६०) केळझरा, धु्रपता चिंतामण खंदारे (६०) रा.धनोडा, सविता तारासिंग राठोड (६०) रा.केळझरा, श्वेता प्रकाश राठोड (१२), भारत लालसिंग राठोड (३८), देवका जानुसिंग राठोड (६०), अंबादास जाधव, कलावती प्रकाश राठोड (३०), सविता राजू जाधव हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Web Title: Bus-tractor accident near Dewarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात