सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे. ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आ ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेलाच घरघर लागली असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आडमुठ्या धोरणाने येथील यंत्रणा कोलमडली आहे. एकाच वेळी तब्बल तीन विभाग प्रमुखांसह दोन सहयोगी प्राध्यापकांची बदली करण्यात आली. ...
वसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला. ...
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. ...
वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. ...
वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही. ...