रस्ते दुरुस्ती जीवावर उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:12 PM2018-01-30T23:12:38+5:302018-01-30T23:12:50+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे.

Roadmap revoked on life | रस्ते दुरुस्ती जीवावर उठली

रस्ते दुरुस्ती जीवावर उठली

Next
ठळक मुद्देनेर-बाभूळगाव मार्गावर गिट्टीचे ढिग : बांधकामचा अजब कारभार

ऑनलाईन लोकमत
नेर : सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे. मागील काही दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्याचे काम जणू वाहनधारकांच्या जीवावर उठले आहे.
रस्त्याची रुंदी कमी असल्याने गिट्टी मधातच रिचविली जात आहे. रात्रीच्या वेळी गिट्टीचे ढिग दिसून पडत नसल्याने त्यावर वाहने आदळत आहे. शनिवारी दुचाकी गिट्टी आदळल्याने मांगलादेवी येथील कुंभारखाने पितापुत्र गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तीन युवक जखमी झाले. नेर येथील संतोष अरसोड हे सकाळी फिरायला गेले असता चक्कर आल्याने सायकलसह कोसळले. रस्त्यावरील गिट्टीने त्यांच्या चेहºयाला मार लागला. ओठ फाटले आणि डोक्यालाही गंभीर इजा झाली. एक दुचाकीही ढिगाºयावर आढळल्याने युवक जखमी झाला.
रविवारी रात्री दाभा (पहूर) येथील प्रवीण विष्णूपंत दसवंते (२०), आकाश जानराव खडसे (१५) व कृष्णा गंगाधर खडसे (वय २१) हे दुचाकीने नेर येथून दाभा येत जात होते. रस्त्याच्या मधोमध असलेल्या गिट्टीच्या ढिगावर दुचाकी आदळल्याने सदर तिघे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची मालिका सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून आहे. कंत्राटदारही सोईने काम करत आहे.

Web Title: Roadmap revoked on life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.