शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हाळ्यात १०८ निराधार वृद्धांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:34 IST

निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देउमरीच्या वृद्धाश्रमाला टंचाईचा फटका : रोज तीन किमी हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.शासनाचा कोणताही आधार नसताना केवळ आणि केवळ माणूसकीच्या बळावर चालणाऱ्या संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमाला तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. उमरीपठार (ता. आर्णी) येथील शेषराव डोंगरे यांच्या प्रचंड धडपडीतून हा वृद्धाश्रम उभा आहे. शासनाची केवळ २५ वृद्ध ठेवण्याची मान्यता असतानाही त्यांनी माणुसकीच्या जाणीवेतून १०८ वृद्धांचा सांभाळ केला आहे. आर्णी, यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रससारख्या ठिकाणचे दानशूर या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी सदैव उभे राहतात.मात्र, आता अन्नाहून भीषण संकट उभे झाले आहे. वृद्धाश्रमात असलेल्या चारही बोरवेल आटल्या आहेत. पण अशाही संकटात एक शेतकरी धावून आला. उमरी शिवारातीलच शेतकरी बंडू शेरे यांच्या विहिरीतून दररोज मोफत पाणी वृद्धाश्रमाला दिले जाते. पण अडचण ही आहे की, ही विहीर आश्रमपासून तीन किलोमीटरवर आहे. शेषराव डोंगरे, जयप्रकाश डोंगरे दररोज ट्रॅक्टरने तेथून पाणी आणत आहेत. त्याचा रोजचा खर्च हजार रुपये आहे.अनुदानाशिवाय चालणाºया वृद्धाश्रमाला या कामासाठी दानशूरांची गरज आहे. वृद्ध आईबाबांची तहान भागविण्यासाठी ‘श्रावणबाळां’नी किमान एक हजारांची मदत करावी, एवढेच आवाहन या वृद्धाश्रमाने केले आहे.