शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यातील दुसरे वाहन जप्त

By admin | Updated: October 7, 2016 02:39 IST

शहरातील सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींकडून शहर ठाण्याच्या शोध पथकाने दुसरे वाहन जप्त केले.

सेमिनरी ले-आऊट : गुन्ह्यात महिला आरोपींचीही भूमिका महत्वाची यवतमाळ : शहरातील सेमिनरी ले-आऊटमध्ये भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींकडून शहर ठाण्याच्या शोध पथकाने दुसरे वाहन जप्त केले. आरोपींमध्ये समन्वय घडवून आणणाऱ्या महिलेने दरोड्याचा गुन्हा घडण्यापूर्वीच नागपुरातील पार्डी दुर्गानगर येथे आत्महत्या केल्याचेही पोलीस तपास पुढे आले आहे. सेमिनरी ले-आऊट येथील अनिल खिवंसरा यांच्याकडे दरोडा घालण्यासाठी त्यांची मोलकरीण व तिचा पती यांच्याकडून माहिती पुरविण्यात आली. नागपुरातील आरोपींशी संधान साधून देणाऱ्या नीता प्रवीण भांडारकर (३२) रा. दुर्गानगर (पार्डी) नागपूर या महिलेचा पोलीस शोध घेत होते. या महिलेने कळंब येथील लक्ष्मण ढोले याची आरोपी इमली उर्फ प्रिया यादव हिच्याशी ओळख करून दिली. या गुन्ह्यात रेकी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली तवेरा क्र.एम.एच-३२-सी-००११ हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहनातून आरोपींनी २६ सप्टेंबर रोजी खिवंसरा यांच्या घराची रेकी केली होती. या गुन्ह्याचा तपास शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक मंगेश भोयर व त्यांचे सहकारी करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)