शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

अन्नाची पाकिटे वितरणासाठी संघटना सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

यवतमाळ शहरातील मागास वस्त्यांमध्ये ही स्थिती प्रकर्षाने पुढे आली आहे. अशा कुटुंबाची यादी स्थानिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तयार केली आहे. त्यांना आता धान्य वितरित केले जात आहे. जमात-ए-ईस्लामी हिंद या संघटनेने गरजवंत कुटुंबाचा शोध घेत मदतकार्य सुरू केले आहे. यामध्ये कुठल्याही एका समाजाचे बंधन न ठेवता सर्वच समाज घटकातील वंचितांना फुड पॅकेट पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमाणुसकीचा प्रत्यय : संचारबंदीने हमाल, मजूर आणि मोलकरणींचे हाल

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संचारबंदी लागू होताच हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पुढे २० दिवसांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. यातून वस्त्यामध्ये हमाल, मजूर आणि मोलकरीण म्हणून काम करणाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. केंद्र शासनाने मदत जाहीर केली. मात्र राज्यात हे आदेश यायचे आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही स्वयंसेवी संघटनांनी माणुसकीचे दशर््ान घडवित फुड पॅकेट्स वितरणास सुरूवात केली आहे. ८ ते १५ दिवस पुरेल इतके धान्य एका कुटुंबाला दिले जात आहे.यवतमाळ शहरातील मागास वस्त्यांमध्ये ही स्थिती प्रकर्षाने पुढे आली आहे. अशा कुटुंबाची यादी स्थानिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी तयार केली आहे. त्यांना आता धान्य वितरित केले जात आहे. जमात-ए-ईस्लामी हिंद या संघटनेने गरजवंत कुटुंबाचा शोध घेत मदतकार्य सुरू केले आहे. यामध्ये कुठल्याही एका समाजाचे बंधन न ठेवता सर्वच समाज घटकातील वंचितांना फुड पॅकेट पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी ३५० कुटुंबांना धान्य वाटले आहे.यामध्ये ५ किलो कणकेचे पाकिट, ५ किलो तांदूळ, २ किलो साखर, २५० ग्राम चहापत्ती, २५० ग्राम तिखट, २५० ग्राम हळद, १ किलो तेलाचे पाकिट, तूरडाळ आणि मसूर डाळ अशी धान्य किट गरजवंताच्या घरापर्यंत नेऊन देण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक भागातील वंचितांसाठी ही मंडळी काम करीत आहे. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन, मुव्हमेंट फॉर पिस अ‍ॅन्ड जस्टीस अ‍ॅन्ड वेल्फेअर संघटनेच्या मदतीने ही मंडळी वंचितांपर्यंत पोहचली आहे.दुसरीकडे विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या नेतृत्वात फुड पॅकेट्स वितरणाचे काम सुरू क रण्यात आले आहे. या मंडळींनी पहिल्या टप्प्यात ३५० कुटुंबांना साहित्य वितरण्याचे काम हाती घेतले आहे. पाच किलो तांदूळ, पाच किलो पीठ, अर्धा किलो डाळ, तेल पॅकेट, मिरची, मिठ, हळद, साबण, कांदे, आलू असे साहित्य दिले जात आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे संघ कार्यवाह प्रदीप वडनेरकर, जिल्हाध्यक्ष संतोष हरनखेडे, नगर अध्यक्ष गौरव सूचक, सुशिल कोठारी, अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, अभिजित डोंगरे, नगर संचालक राहुल ढोक आदी यासाठी काम करीत आहे. तैनात असलेल्या पोलिसांना चहा आणि नास्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भूपेंद्र सिंग ठाकूर, योगीन तिवारी यासाठी काम करीत आहे.याचसोबत संजय ठाकरे, अनिसभाई, अश्रफभाई यांनी लोहारा आणि पांढरकवडा बायपासवरील घरांपर्यंत धान्य पोहचविले. यात गहू, तांदूळ, डाळ, तेल, मिठ, हळद, साबण, बेसन, आलू, कांदे वितरित केले आहे. या मदतीमुळे संचारबंदी दरम्यान अनेकांचा उदरनिर्वाह सुकर होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक