जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:57 IST2024-12-16T17:55:17+5:302024-12-16T17:57:24+5:30

Yavatmal : २००९ नंतर पहिल्यांदाच मिळाले तीन मंत्री

Opportunity for MLAs from all three parties in the district; Finally, the backlog of ministerial posts is cleared | जिल्ह्यातील तीनही पक्षांतील आमदारांना संधी; अखेर मंत्रिपदाचा बॅकलॉग निघाला

Opportunity for MLAs from all three parties in the district; Finally, the backlog of ministerial posts is cleared

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
जिल्ह्याचे राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व राहिले आहे. येथील आमदार हेवीवेट म्हणूनच ओळखल्या गेले आहेत. २००९ मध्ये जिल्ह्यातून तीन कॅबिनेट मंत्री होते. सत्ता बदल झाल्यानंतर जिल्ह्याचे राज्यमंत्री मंडळातील प्रतिनिधी कमी झाले. १५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आता जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. यामुळे मंत्रिपदाचा बॅकलॉग भरून निघाला आहे.


महायुतीत असलेल्या तीनही पक्षांतील आमदारांना संधी देण्यात आली आहे. यात भाजप व शिंदेसेनेला कॅबिनेट दर्जा तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यमंत्री दर्जा देण्यात आला. निवडणूक निकालानंतर मंत्री कोण राहणार याविषयी उत्सुकता होती. संजय राठोड, डॉ. अशोक उईके, इंद्रनील नाईक यांचीच नावे संभाव्य म्हणून चर्चेत होती. या तिघांनी रविवारी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१९ मध्ये भाजपचे अशोक उईके यांना केवळ चार महिने कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली, नंतर त्यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. राळेगाव, पुसद, दिग्रस येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


चौथ्यांदा घेतली शपथ 
आमदार संजय राठोड यांनी डिसेंबर २०१४ मध्ये राज्यमंत्री, डिसेंबर २०१९ मध्ये वनमंत्री, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वस- नमंत्री, ऑगस्ट २०२२ मध्ये अन्न व औषधी प्रशासन त्यानंतर २०२३ मध्ये मृद, जलसं- धारणमंत्री म्हणून काम केले. आता चौथ्यांना शपथ घेतली.


दुसऱ्यांदा मंत्रिपद
प्रा.डॉ. अशोक उईके यांना २०१९ मध्ये केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मंत्री म्हणून मिळाला. त्यानंतर, दीर्घकाळ ते प्रतीक्षेत राहिले. आता त्यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि मितभाषी आहे. पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. 


१० वर्षानंतर लाल दिवा 
नाईक घराण्यात २०१४ पासून मंत्रिपद नव्हते. हा दीर्घकालावधी राहिला. दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्री- पदाची शपथ घेतली. यामुळे पुसद येथील नाईक बंगल्याला पुन्हा एकदा लालदिवा मिळाल्याने प्रतीक्षा संपली.


संजय राठोड यांचा मास्टर स्ट्रोक
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच संजय राठोड यांच्याबद्दल विविध प्रकारच्या वावड्या उडविल्या गेल्या. अगदी विधानसभेची निवडणूक राठोड पराभूत होतील, असेही दावे केले जात होते. विजयश्री खेचून आणत त्यांनी याला चोख उत्तर दिले. त्यानंतर, संजय राठोड यांचा संभाव्य मंत्रिमंड- ळातून पत्ताकट अशी चर्चा रंगू लागली. या चर्चेलाही राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन संपुष्टात आणले.


प्रा.डॉ. अशोक उईकेंनी केले कमबॅक
जून २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या चार महिन्याच्या मंत्रिपदाच्या काळात अशोक उईके यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला. त्यामुळे भाजपकडून पहिल्या यादीत उईकेंना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.

Web Title: Opportunity for MLAs from all three parties in the district; Finally, the backlog of ministerial posts is cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.