शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अनुदानित बियाणांची खुल्या बाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM

यातून १८ ते २० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उंबरकर यांनी तक्रारीतून केला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब व सामान्य शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी अनुदानावर अल्प दराने बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु कृषी विभागातील व महाबिज मंडळातील अधिकाºयांनी कृषी केंद्र चालकांना हाताशी धरून बियाणांवरील अनुदान लाटत सदर बियाणे खुल्या बाजारात विकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींचा घोटाळा : मनसेने केली जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी मंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शोषण अद्यापही थांबलेले नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणारे चणा बियाणे चक्क खुल्या बाजारात विकण्यात आल्याची गंभीर तक्रार मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हाधिकाºयांसह थेट कृषी मंत्र्यांकडे केली आहे.यातून १८ ते २० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उंबरकर यांनी तक्रारीतून केला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब व सामान्य शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी अनुदानावर अल्प दराने बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु कृषी विभागातील व महाबिज मंडळातील अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकांना हाताशी धरून बियाणांवरील अनुदान लाटत सदर बियाणे खुल्या बाजारात विकले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहे. महाबिज मंडळाकडून सन २०१९ च्या रबी हंगामासाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता २८ हजार क्विंटल चणा बियाणे देण्यात आले होते. यातील १८ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्याचे आदेश होते. हे बियाणे वाटप करण्याआधी या योजनेची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी आपापल्या तालुक्यातील वितरकांची यादी प्रसिद्ध करणे किंवा त्यासंदर्भात पत्रकार परिषदांमधून माहिती देणे गरजेचे होते. परंतु असे काहीही करण्यात आले नसल्याचे उंबरकर यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन हा घोटाळा करण्यात आला असून यातून शासनाचीदेखील फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घोटाळ्यामुळे गरिब लाभार्थी शेतकरी अनुदानावर मिळणाºया चणा बियाणापासून वंचित राहिला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.अधिकारी, कृषी केंद्रचालकांवर कारवाई करासामान्य गरिब शेतकऱ्यांसाठी अनुदानावर असलेल्या बियाणांची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली असून या घोटाळ्यात सहभागी असलेले कृषी अधिकारी व कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

टॅग्स :agricultureशेती