शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावचे रुग्णालय केवळ दोन डॉक्टरांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी करूनही काहीएक कारवाई झालेली नाही. २४ कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी येथे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहे.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी पद रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० ते ४०० रुग्ण ओपीडीत असतात. अनेक रुग्ण भरती असतात. याशिवाय अत्यवस्थ रुग्ण, प्रसूतीच्या केसेस, एमएलसी, शवविच्छेदन, यवतमाळ, अकोला स्थानिक मिटींग आदींमध्ये डॉक्टरांची सतत व्यस्तता राहते. असे असताना गेल्या वर्षीपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार केवळ दोन डॉक्टरांच्या भरवशावर चालविला जात आहे.येथे स्थापनेपासून २०-२५ वर्षात एक-दोन वर्षांचा अपवाद वगळता प्रथमश्रेणी एम.डी. अधीक्षक कधीच देण्यात आले नाही. प्रभारावरच या पदाचा कारभार चालू आहे. त्यातच एका वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने दोन डॉक्टरांना सतत सर्वच कामे दिवसरात्र करावी लागतात. आठ तासांची ड्यूटी, सुटी आदी बाबी केवळ कागदावरच राहून जातात.डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी करूनही काहीएक कारवाई झालेली नाही. २४ कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी येथे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले आहे. एकीकडे त्यांच्या या काळात बदल्या झालेल्या नाहीत, तर दुसरीकडे रुग्णांच्या आरोग्यसेवेत त्यांच्याकडून कुचराई केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.रुग्णांना सन्मानाची वागणूक देण्याऐवजी अपमानित करणे आदी प्रकार घडत आहेत. एका कर्मचाºयास तब्बल चारवेळा निलंबित केले. तरी त्याच्या वागण्यात कवडीचाही फरक पडला नसल्याचे सांगितले जाते. रुग्णसेवेकरिताच नेमणूक करण्यात आली असल्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येते.ट्रामा सेंटर पूर्ण होऊनही प्रतीक्षाचअडीच कोटी रुपये खर्च करून आपात्स्थिती, अपघात आदीतील रुग्णांना त्वरित येथेच परिपूर्ण सेवा मिळावी म्हणून ट्रामा सेंटरकरिता इमारत बांधण्यात आली. याकरिता पदभरती करण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींकडून दोन वर्षांपासून सांगितले जात आहे. पण अद्यापही पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे इमारतीचा उपयोग रुग्णांकरिता होऊ शकलेला नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांच्या अखत्यारित आता या प्रश्नाला गती देण्याची गरज व मागणी आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल