शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अवघे वेळाबाईवासीय हळहळले

By admin | Updated: October 11, 2015 00:42 IST

तालुक्यातील वेळाबाई येथील होतकरू युवक संदीप सुरेश रासेकर (२२) याचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अपघाती मृत्यू झाला.

वणी : तालुक्यातील वेळाबाई येथील होतकरू युवक संदीप सुरेश रासेकर (२२) याचा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अपघाती मृत्यू झाला. त्याला शुक्रवारी संपूर्ण गावाने श्रद्धांजली अर्पण करून हळहळ व्यक्त केली. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेत असतानाच संदीपला महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीक बोर्डमध्ये नोकरी लागली होती. ती स्विकारून गरीब आई-वडिलांचे पांग फेडण्यास सक्षम होणाऱ्या संदीपच्या अपघाती मृत्युमुळे अवघे गाव हळहळले. संदीप अत्यंत मनमिळावू आणि संपूर्ण गावाला आपलासा वाटणारा युवक होता. गरिबीतून वाट काढत त्याचे शिक्षण सुरू होते. शिक्षण घेत असतानाच तो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक बोर्डमध्ये नोकरी स्वीकारून बसमत (जि.हिंगोली) येथे वर्षभरापूर्वी रूजू झाला होता. नोकरीमुळे संदीपच्या परिवाराचे वाईट दिवस जाऊन चांगल्या दिवसांची सुरूवात झाली होती. मात्र काळाने डाव साधला अन् ६ आॅक्टोबरला वसमत येथे काम करताना इलेक्ट्रीक खांबावर जिवंत विद्युत तारेला चिपकून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची खबर कळताच अख्खे वेळाबाई हादरले. रासेकर परिवारावर उजेडाचे किरण पडताच पुन्हा गडद अंधार पसरला. गावकऱ्यांच्या सुख-दु:खात धावणारा, सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होणारा संदीप ऐन तारूण्याच्या बहरात गळून पडला. त्याच्या जाण्याने त्याचा परिवारच नव्हे, तर संपूर्ण गाव दु:खाने हळहळत आहे. शुक्रवारी त्याला गावात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महावितरणचे कर्मचारी, त्याचे नातलगत व संपूर्ण वेळाबाईवासीय डबडबलेल्या डोळ्यांनी उपस्थित होते. त्याच्या मागे आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)