शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

118 गावांसाठी केवळ 63 पोलीस कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

सन १९२२ ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट  समाविष्ट करण्यात  आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव ठाणे आहे. पांढरकवडा तालुका आणि शहर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंदविला आहे.

प्रवीण पिन्नमवारलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्येच्या रक्षणासह कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पांढरकवडा पोलीस ठाण्यात केवळ ६३ पोलीस कार्यरत आहेत. त्यांच्यावर ११८ गावांची जबाबदारी आहे. ठाण्याचे कार्यक्षेत्र आणि घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता, पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. बंदोबस्ताच्या काळात तर पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याची मागणी केली जात आहे.सन १९२२ ला ब्रिटिशकालीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्याचवेळी पांढरकवडा पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने येथे रुंझा, करंजी, पाटणबोरी या तीन ठिकाणी दूरक्षेत्र आउटपोस्ट  समाविष्ट करण्यात  आले. सद्य:स्थितीत सर्वात जास्त तीन आउटपोस्ट असणारे यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव ठाणे आहे. पांढरकवडा तालुका आणि शहर संवेदनशील म्हणून पोलीस दप्तरी नोंदविला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना नेहमी सज्ज रहावे लागते. परंतु पांढरकवडा पोलीस ठाण्यात शिपायांची पदे रिक्त आहे. येथे ९७ पदे मंजूर असताना केवळ ६३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील चार ते पाचजण साप्ताहिक रजेवर, तर चार ते पाचजण किरकोळ कारणाने सुट्टीवर असतात. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे एक लाख ५६ हजार २९० लोकसंख्या आहे. ठाण्याअंतर्गत ११८ गाव असून, पांढरकवडा ते अर्ली ४८ किलोमीटर तेलंगणा सीमेपर्यंत एका टोकाला, तर पांढरकवडा ते मोहदा २८ किलोमीटर दुसऱ्या टोकाला इतक्या किलोमीटरचा विस्तार आहे. त्यामुळे काही घटना घडल्यास पोलिसांना पोहोचण्यास विलंब होतो. नागरिकांमध्ये पोलिसांप्रति असंतोष दिसून येतो. तेलंगणा सीमा, राष्ट्रीय महामार्ग तर दूरपर्यंत असलेले पोलिसांचे कार्यक्षेत्र यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. अत्यल्प पोलीस बळाच्या भरवशावर सर्वत्र लक्ष ठेवण्याची मोठी कसरत दिसून येते. या ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची ९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे ही पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांची रिक्त आहे.

नक्षल भत्त्यापासून पोलीस शिपाई वंचितकार्यरत पोलीस शिपाई हे २०१७ पासून नक्षलग्रस्त भत्त्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हा नक्षलग्रस्त भत्ता मिळत आहे. परंतु येथील शिपाई यापासून वंचित आहेत. तसेच शिपायांच्या कमतरतेमुळे कामाचा ताण वाढला आहे. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाकडे व आरोग्याकडे होत असून, लक्ष देण्यात अडचणी येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस