शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

प्लाॅट विक्रीची केली ऑनलाइन जाहिरात; ७० हजारांनी घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

प्लॉटच्या कागदपत्रांची झेरॉक्सही घेतली. इसाराची रक्कम म्हणून दोन लाख रुपयाचा धनादेश पराते यांना दिला. त्यानंतर एजंट बंडू मानकर याने कमिशनची रक्कम मागितली.  चौकशी केली असता, बंडू मानकर याने नागपूरमध्ये अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. त्याचे मूळ नाव प्रकाश बापूरावजी मनवर असल्याचेही पुढे आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फसवणुकीसाठी कोण कसा फंडा वापरेल, याचा नेम नाही. यवतमाळातील ९०० स्वेअरफूट प्लॉट विक्रीची ऑनलाइन बेवसाईटवर जाहिरात करण्यात आली. ते पाहून नागपुरातील दोन खरेदीदार यवतमाळात पोहोचले. त्यांनी ९०० रुपये प्रति चौरस फूट दराचा प्लॉट हजार रुपये दराने खरेदी केला. दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. एजंटने कमिशनचे ७० हजार मात्र रोख घेतले. नंतर तो धनादेश वटलाच नाही. विश्वनाथ तुकाराम पराते रा. राऊत ले-आऊट बोरीअरब यांचा यवतमाळातील लोहारा परिसरात सप्तश्रृंगीनगरमध्ये प्लॉट विक्रीस होता. पराते यांच्या मुलाने या प्लॉट विक्रीची जाहिरात बेवसाईटवर टाकली. ती जाहिरात पाहून नागपूर येथील बंडू मानकर ऊर्फ प्रकाश बापूरावजी मनवर आणि अश्विन सिद्धार्थ लांडगे यांनी संपर्क केला. या दोघांनीही नंतर यवतमाळ गाठले. यातील बंडू मानकर हा एजंट म्हणून तर अश्विन लांडगे हा ग्राहक म्हणून भेटला. एजंट बंडू मानकर याने विश्वनाथ पराते यांना त्यांचा प्लॉट हजार रुपये दराने विक्री करून देतो त्यातील वरचे १०० रुपये कमिशन म्हणून लागतील, असा प्रस्ताव ठेवला. त्याला पराते यांनी होकार दिला. नंतर खरेदीदार बनलेल्या अश्विन लांडगे याने दोन्ही प्लॉट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. प्लॉटच्या कागदपत्रांची झेरॉक्सही घेतली. इसाराची रक्कम म्हणून दोन लाख रुपयाचा धनादेश पराते यांना दिला. त्यानंतर एजंट बंडू मानकर याने कमिशनची रक्कम मागितली.  चौकशी केली असता, बंडू मानकर याने नागपूरमध्ये अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. त्याचे मूळ नाव प्रकाश बापूरावजी मनवर असल्याचेही पुढे आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बोरीअरब या मूळगावी जावून दिली रोख - पराते यांनी त्यांच्या मूळ गावी बोरी येथे नेवून बंडू मानकर याला ७० हजार रुपये रोख दिले. नागपूर आलेले दोघेही निघून गेले. २७ मे रोजी दोन लाखांचा धनादेश पराते यांनी पत्नीच्या नावे असलेल्या बँक खात्यात वटविण्यास टाकला; मात्र तो धनादेश अनादर झाला. नंतर त्या दोघांशी संपर्क केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी