यवतमाळ - कारंजा रोडवरील कोव्हळा पुनर्वसन गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गौतम महादेव वानखडे (५५) रा.कोव्हळा (पुनर्वसन) असे मृताचे नाव आहे. गौतम वानखडे हे एम.एच.२९/क्यू-३३२ या क्रमांकाच्या दुचाकीने नेर येथून शेतात जात होते. पिंपळगाव(काळे) येथून एम.एच.२९/पी-५८५३ या क्रमांकाच्या दुचाकीने भोजराज नीळकंठ जुनघरे (४५) रा.पिंपळगाव(काळे) हे नेर येथे येत होते. या दोघांची कोव्हळा पुनर्वसनाजवळ धडक झाली. यात गौतम वानखडे ठार झाले. सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे, पवन चिरडे यांच्याकडे या घटनेचा तपास आहे.
कारंजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 22:05 IST