शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटींच्या गुटखा जप्तीने अन्न व औषधी प्रशासनाची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: January 28, 2016 02:36 IST

एसपींच्या विशेष पथकाने आर्णीतील प्रतिबंधित गुटख्याचा तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईने आर्णी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

आर्णी पोलिसांचीही ‘कर्तव्यदक्षता’ उघड : कारंजा ‘कनेक्शन’, सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान
यवतमाळ : एसपींच्या विशेष पथकाने आर्णीतील प्रतिबंधित गुटख्याचा तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईने आर्णी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. या दोनही यंत्रणांच्या संगनमताने गुटख्याचा हा कारभार आतापर्यंत राजरोसपणे चालविला जात असावा, अशी शंका घेण्यास प्रचंड वाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या विशेष पथकाचे फौजदार हिवसे यांनी आर्णी शहरात सुमारे एक कोटी रुपये किंमतीचा सात ट्रक प्रतिबंधित गुटखा जप्त केला. सहा गोदामांवर रविवारी दुपारपासून या धाडी घातल्या गेल्या. विशेष असे, आर्णी शहरातील भरवस्तीत आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील गोदामांमध्ये हा गुटखा साठविण्यात आला होता. मध्य प्रदेश-आंध्र प्रदेशातून हा गुटखा आर्णीत आणला जातो. या गोदामातूनच गुटख्याची ने-आण केली जात होती. त्यानंतरही आर्णी पोलीस या कारभारापासून अनभिज्ञ कसे हा मुख्य प्रश्न आहे. अट्टल गुन्हेगारांना सहज शोधून काढणाऱ्या आर्णी पोलिसांना आपल्या गावातील गुटख्याच्या गोदामांबाबत माहिती नसावी, ही बाबच कुणालाही न पटणारी आहे. खाकी वर्दीतील ‘आशीर्वादा’मुळेच तस्कराने आर्णीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठेबाजी करण्याची हिंमत दाखविली असावी, असे मानले जाते. यवतमाळचा नीलेश नामक व्यक्ती गुटख्याची संपूर्ण जिल्ह्याची वसूली करीत असल्याची चर्चा पोलीस वर्तूळात आहे.
एक कोटींच्या या गुटखा जप्तीच्या कारवाईने अन्न व औषधी प्रशासनाची कर्तव्यदक्षताही उघड झाली आहे. सहायक आयुक्त (अन्न) जयंत वाणे आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या यवतमाळ कार्यालयाचे प्रमुख अमृत निखाडे (औषधी) यांच्यावर जिल्ह्यातील प्रतिबंधित गुटख्याची तस्करी रोखण्याची मुख्य जबाबदारी कायद्याने सोपविली आहे. मात्र ती समर्थपणे पार पाडण्यात या विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याचे आर्णीतील कारवाईवरुन स्पष्ट होते. मुळात प्रतिबंधित गुटखा रोखण्याची, माहिती काढून त्यांची गोदामे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची आहे. पाहिजे तेथे पोलिसांची मदतही त्यांना सहज उपलब्ध होते. परंतु आमच्याकडे ‘मॅन पॉवर नाही’ अशी सबब वारंवार पुढे करून हा विभाग आपली जबाबदारी टाळत असल्याचे अनेकदा उघड झाले.
आर्णीतील या गुटखा तस्कराचे यवतमाळातही गोदाम असल्याचे सांगितले जाते. या गुटखा तस्करीचे जाळे पुसद-कारंजा-अकोलापर्यंत पोहोचले आहेत. कारंजा हे विदर्भ-मराठवाड्यातील गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र आहे. काही दिवसांपूर्वी दारव्हा येथे कारंजाच्या गोदामातून आलेला ट्रक पकडण्यात आला होता. तर पांढरकवडा येथे गुटख्याचा ट्रक ‘पास’ झाला होता. कारंजातील गुटखा माफियाचे ट्रक कुठे पकडले जातात तर कुठे सोडले जातात. मात्र पकडल्या गेलेल्या ट्रकची कारवाई आजतागायत चालकाच्यापुढे गेली नाही. वास्तविक चालकाच्या माध्यमातून कारंजाच्या मुख्य गोदामापर्यंत पोहोचणे पोलिसांना व अन्न-औषधी प्रशासनाला कठीण नाही. मात्र ‘उलाढाली’पुढे नंतरची कारवाई मंदावते. गेल्या काही दिवसांपासून कारंजावर ‘हॅमरिंग’ होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधित गुटख्याचा पर्यायी तळ आर्णीत निर्माण करण्यात आला होता. आर्णीतून संपूर्ण विदर्भात तर कारंजातून संपूर्ण मराठवाड्यात गुटखा पोहोचविला जात असल्याचे सांगण्यात येते. या गुटख्याचा सर्वेसर्वा कारंजात असून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एसपींच्या या बेधडक कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. आर्णीत कारवाई सुरू असताना पोलिसांचे पथक यवतमाळ व अन्य गोदामातही पोहोचण्याच्या भीतीने तेथील गुटख्याच्या मालाची क्षणात विल्हेवाट लावल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)