शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

संचालक मंडळावर गुन्हा

By admin | Updated: August 18, 2014 23:49 IST

गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राळेगाव : गुंतवणूकदार आणि अभिकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणाची सांगता झाली. संस्थेच्या अध्यक्ष लता विनोद वनकर, त्यांचे पती तथा संस्थेचे सर्वेसर्वा विनोद वनकर, व्यवस्थापक हेमंत वनकर, संजय कोटंबकर, बळवंत मून यांच्यावर भादंवि ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पतसंस्थेने गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. शिवाय अभिकर्त्यांनाही टोलविले जात होते. याविरोधात गेली तीन-चार महिन्यांपासून अभिकर्ते व ग्राहक संघर्ष समितीने आंदोलनात्मक पाऊल उचलले. तहसीलदार, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदने दिली. परंतु प्रत्येक ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे गेली पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. विजयराज सेगेकर यांनी पुढाकार घेत अ‍ॅड. प्रफुल्ल चौहाण आणि अ‍ॅड. फिडेल बायदानी यांच्या मदतीने प्रशासनाशी चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे ठरविले. आॅडिटची कार्यवाही ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे सहायक निबंधक यांनी शासनातर्फे लेखी दिले. यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणात योगेश बनसोड, मनोज गुजरकर, विशाल डडमल, रामेश्वर एंबडवार, राहुल ठाकरे, आगा हुसेन शेख, चंद्रकांत बेसेकर, वसंत पोटफोडे, सुनील संगेवार, ईश्वरलाल जयस्वाल, कृष्णराव डफाडे, पुरुषोत्तम आवारी, पवन केवटे, गजानन सरदार, रजनी महाजन आदी सहभागी झाले होते. विजयराज सेगेकर यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले. सदर पतसंस्थेत हजारो गरीब कुटुंबाने गुंतवणूक केली आहे. यात छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)