शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट पायदळी

By admin | Updated: August 31, 2015 02:20 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी शासनाने आदेश दिले असले तरी या बँकांनी कर्जपुरवठ्याचे उद्दीष्ट पायदळी तुडविल्याचे दिसत आहे.

महागाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी शासनाने आदेश दिले असले तरी या बँकांनी कर्जपुरवठ्याचे उद्दीष्ट पायदळी तुडविल्याचे दिसत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांची दररोज गर्दी होत असून उंबरठे झिजवून शेतकरी त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकां दलालांच्या विळख्यातच अडकल्याचे दिसत आहे. भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक शेतकऱ्यांना विचारायला तयार नाही. फुलसावंगीच्या सेंट्रल बँकेला कारणेदाखवा नोटीस देण्यात आली. बँक व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. कोणत्या बँकेने किती कर्ज पुरवठा केला याची आकडेवारी राष्ट्रीयकृत बँका लपवून ठेवत आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा देण्यासाठी बँकेने स्वत:हूनच बंदी आणली आहे. जुनी प्रकरणे अद्यापही हातावेगळी झालेली नाही. त्यामुळे नव्या शेतकऱ्यांना बँकेचे दार बंद करण्यात आले आहे. आॅगस्ट संपला तरी पीक कर्जाचे ओझे कमी झाले नाही. सोयाबीनवर खोडकीड आल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु त्यांच्याजवळ कीटकनाशक घेण्यासाठीही पैसे नाही. कर्जाचे पुनर्गठण होईल आणि शेतकरी उभी करता येईल या आशेत शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवित आहे. परंतु बँकेत शेतकऱ्यांना साथी सौजन्याची वागणूकही मिळत नाही. युनियन बँक तर दलालांच्या विळख्यातच सापडल्याचे दिसत आहे. सामान्य शेतकरी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. बँक व्यवस्थापक फोन उचलत नसल्याची ओरड आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.युनियन बँकेत एक आणि स्टेट बँकेत दुसरा असा भेदभाव कर्ज वाटपात दिसत आहे. शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी हेक्टरी घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे. जणू स्टेट बँक आपल्या खिशातूनच पैसा देत असल्याचा भास निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जापासून वंचित आहे. एकीकडे सावकार बंदी आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)