शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेची वैद्यकीय अधिकाऱ्यालाच मारहाण

By admin | Updated: November 10, 2014 22:49 IST

तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला येथीलच परिचारिकेने नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. रुग्णालयात

महागाव : तालुक्यातील सवना ग्रामीण रुग्णालयात रात्री ८ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला येथीलच परिचारिकेने नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. रुग्णालयात पूर्ण वेळ उपस्थित राहून सेवा देणाऱ्याच वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यातील दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात सोमवारी सकाळी गर्दी केली होती. शासकीय सेवेत नेहमीच वरिष्ठांकडून कनिष्ठांची प्रताडना केली जाते. सवना येथे मात्र उलट प्रकार पहावयास मिळाला. रविवारी येथील ग्रामीण रुग्णालयात एकाचवेळी दोन गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. एकाने विष प्राशन केले होते तर गरोदर महिला तपासणीस आली होती. रुग्णाची स्थिती अतिशय नाजूक असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन उके हे त्यांच्यावर उपचार करण्यात व्यस्त होते. तेवढ्यातच परिचारिका स्वत:च्या आईला घेऊन रुग्णालयात आली. तिने डॉक्टरांना आईची तपासणी करण्यास सांगितले. मात्र दोन्ही रुग्ण गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांच्यावर उपचार करने आवश्यक होेते. ही स्थिती समजून न घेता परिचारिकेने डॉक्टर सोबत वाद घालणे सुरू केले. उपस्थितांनी दोघांची समजूत काढली. त्यानंतर ती परिचारिका आपल्या आईला घेऊन घराकडे परत गेली. यावरच ती परिचारिका थांबली नाही तर तिने आपल्या चार नातेवाईकांना सोबत घेऊन पुन्हा ग्रामीण रुग्णालय गाठले. येथे कामत व्यस्त असलेल्या डॉ. सचिन उके यांना काहीएक न विचारता त्या सर्वांनी मारहाण करणे सुरू केले. नेमका काय प्रकार घडतोय हे सुद्धा डॉक्टरच्या लक्षात आले नाही. बराच वेळ मारहाण केल्यानंतर हे सर्व जण धमकावून निघुन गेले. या घटनेने धास्तावलेल्या डॉक्टरने कुठेच वाच्यता केली नाही. सकाळी हा मारहाणीचा प्रकार माहीत झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांनी नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णांच्या सेवेत सातत्याने व्यस्त असलेल्या डॉक्टरला क्षुल्लक कारणावरून झालेली मारहाण ग्रामस्थांना सहन झाली नाही. त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी परिचारिकेच्या घराकडे मोर्चा वळविला. मात्र मोठा जमाव घराकडे येत असल्याचे पाहून परिचारिका व तिच्या नातेवाईकांनी स्वत:ला घरात बंद करून घेतले. शेवटी गावातील ज्येष्ठांनीच समजूत काढून हे प्रकरण निपटविले. मात्र या घटनेबाबत तक्रार द्यावी असा आग्रह वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन उके यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी परिचारिकेसह चार आरोपींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेची रुग्णालय अधीक्षक डॉ. हरीभाऊ फुफाटे यांनी गंभीर दखल घेत त्याबाबतचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्साकडे पाठविला आहे. त्यामध्ये सदर परिचारिकेची तातडीने बदली केली जावी व वर्तनुकीबाबत शासकीय सेवा अधिनियमानुसार कारवाई व्हावी अशी शिफारस केली आहे. (शहर प्रतिनिधी)