शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

ना कॉल, ना ओटीपी, तरी बॅंकेतून पैसे गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 5:00 AM

पूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे. आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते. ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ-दहा वेळेस करतात. या परिस्थितीत तात्काळ प्रकरण पुढे आले तर असे पैसे वळते करताना बँकांना नोटीस बजावून पैसे रोखता येतात. 

ठळक मुद्देतत्काळ सायबर सेलशी संपर्क साधा : आपले पैसे रोखता येतील, काही रकमा परत आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पैसे काढण्यासाठी आणि पैसे वळते करण्यासाठी अलिकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढला आहे. ही पद्धती चांगली असली तरी यामध्ये काही ठगगिरी करणारे नागरिकही शिरले आहे. ते ग्राहकांचा ओटीपी मिळवून असे पैसे लुटतात.जिल्ह्यामध्ये २०१९ पासून २०२१ पर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहे. ज्यामध्ये पैसे ठगगिरी करणाऱ्या व्यक्तीने काढून घेतले. नंतर ते ई-वाॅलेटमध्ये वळते केले. याच क्षणी तक्रार आल्यानंतर अलिकडे ४५ हजार रुपयांची रक्कम आणि पाच हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देता आली. अनेकांना ही रक्कम वापस मिळाली. मात्र ज्यांनी उशीर केला त्यांना पैसे गमवावे लागले. ग्राहकांनी आपला फोन वापरताना कुठल्याही प्रलोभनात न पडता आपला ओटीपी किंवा बँकेचा अकाऊंट नंबर इतरांना वळता करू नये. आपला ओटीपी दुसऱ्यांना मिळाला तरच असे पैसे चोरीला जातात. यासाठी फसव्या जाहिरातीपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

पैसे परत मिळण्याची शक्यता कमीचपूर्वी हॅकरकडून २४ तासात पैसे परत मिळविता येत होते. आता हॅकरने आपली पद्धती बदलविली आहे. आपल्या खात्यातून जसे पैसे चोरीला गेले त्याच क्षणी सायबर सेलशी संपर्क केला पाहिजे. यामुळे पैसे परत मिळणे शक्य होते. ठगविणारे नागरिक वळते केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात असे नऊ-दहा वेळेस करतात. या परिस्थितीत तात्काळ प्रकरण पुढे आले तर असे पैसे वळते करताना बँकांना नोटीस बजावून पैसे रोखता येतात. 

अनोळखी ॲप नकोच- अनेकवेळा मोफत गाणे डाऊनलोड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्याच्या अनेक जाहिरात स्मार्ट फोनवर क्षणात दिसतात. अशावेळी असे ॲप डाऊनलोड करताना आपण चारवेळेस विचार केला पाहिजे.- वस्तू महागडी असतानाही काही कंपन्या फार स्वस्त दरात आपली वस्तू असल्याचा दावा करतात. अशावेळी ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. प्रथम वस्तू आल्यानंतरच त्याचे पैसे अदा केले पाहिजे.- ऑनलाईन व्यवहार करताना अनेकवेळा ग्राहकाचा संपूर्ण डाटा हॅकरकडून चोरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रथम साईटची खात्री करावी.

सायबर सेल अधिकारी म्हणतात...ग्राहकांनी स्मार्ट फोन वापरताना आपल्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. कुठलीही प्रलोभने दाखविल्या गेली तर प्रथम ती साईट खरी आहे का, याचा शोध घेतला पाहिजे. आपला ओटीपी दुसऱ्यांना शेअर करू नेये.- अमोल पुरीएपीआय, सायबर सेल

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँक