यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:19+5:30

बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्रीही पुसद तालुक्यातील हुडीची रहिवासी असलेली एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिचा पतीसुद्धा यापूर्वीच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते.

Nine corona positive in Yavatmal | यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

ठळक मुद्देअ‍ॅक्टीव्ह बाधितांचा आकडा १६ : पुसद, दिग्रस, महागाव तालुक्यात शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आतापर्यंत शहरात असलेला कोरोना उद्रेक नियंत्रणात असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असतानाच तो मात्र औटघटकेचा ठरला. कोरोनाने आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दूरवर शिरकाव केला आहे. बुधवारी एकाच वेळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा हादरले आहे.
बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातून त्यांनी प्रवास केल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्रीही पुसद तालुक्यातील हुडीची रहिवासी असलेली एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. तिचा पतीसुद्धा यापूर्वीच पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. मंगळवारी सायंकाळी हुडी गावातील गौतम कांबळे (५५) या इसमाचा पुसद येथे वैद्यकीय तपासणी करून परत जात असताना मार्गातच मृत्यू झाला. परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.
बुधवारच्या नऊ पॉझिटिव्हसह जिल्ह्यातील बाधित अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतचा एकूण बाधितांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे. त्यापैकी ९६ जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा पाचपर्यंत खाली आला होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसात त्यात झपाट्याने वाढ झाल्याने तो १६ वर पोहोचला आहे.
बाधित पुसदच्या विलगीकरण कक्षात
बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या पुसद, दिग्रस व महागावच्या रुग्णांना सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोविड केअर सेंटर येथे भरती आहेत. पुसद येथील सुरवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकूण १७ लोकांचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. यापैकी ९ पॉझिटिव्ह, ६ निगेटिव्ह आणि २ रिपोर्ट अप्राप्त आहे.

२१ अहवालांची अद्याप प्रतीक्षा
सुरवातीपासून आतापर्यंत शासकीय महाविद्यालयाने एकूण १८४७ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी आतापर्यंत ११२ पॉझिटिव्ह, १७१६ निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले तर २१ रिपोर्ट अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १४ जण आणि गृहविलगीकरणात ५८१ जण आहेत.

Web Title: Nine corona positive in Yavatmal