शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरीचा नवीन फंडा

By admin | Updated: July 17, 2014 00:21 IST

शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत

रिडिंग घेताना दुर्लक्ष : अनेक भागात होतो पाण्याचा अपव्यययवतमाळ : शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनला मध्येच रबरी पाईप बसवून तेथून थेट पाणीपुरवठा घेतला जातो. या पाण्याचा अतिशय बेजबाबदारीने वापर होतो. तेथे मोटरपंप लावून पाणी घेण्यात येते. परिणामी अनेक भागात पुरेशा दाबाने पाणीच पोहोचत नाही. पाणी चोरीच्या या नवीन फंड्यामुळे जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडत आहे. अनेक ठिकाणी मोटरपंप लावूनही पिण्यापूरतेही पाणी येत नाही. ज्याठिकाणी पाण्याची चोरी होते तेथे शुद्ध पाण्याचा वापर हा बांधकामासाठी, वाहने धुण्यासाठी केला जातो. सातत्याने हे पाणी बेजबाबदारपणे विविध कामांसाठी वापरले जाते. एकीकडे नळाच्या पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या कुटुंबांची परवड सुरू आहे. मात्र काही भागात संधीसाधूंनी पाणी चोरीच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू केली आहे. शिवाय पाण्याचे मीटर फिरत नसल्याने त्यांना कुठलाच भुर्दंड बसत नाही. मीटर रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहज नजर टाकल्यास हा पाणीचोरीचा प्रकार उघडकीस येऊ शकतो. जीवन प्राधिकरणच्या उपअभियंत्यांनी याची तातडीने दखल घेऊन पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. जेणेकरून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही. शिवाय पाणी चोरट्यांवर वचक निर्माण करता येईल. यासाठी जीवन प्राधिकरणने विशेष पथकाचे गठण करून स्वतंत्र मोहीमच हाती घेण्याची गरज आहे. याबाबत अ‍ॅड. श.श्री.माळवी यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)