रेल्वे स्टेशन चौकात नेताजी जयंती

By Admin | Updated: January 24, 2016 02:17 IST2016-01-24T02:17:46+5:302016-01-24T02:17:46+5:30

येथील रेल्वे स्टेशन चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

Netaji Jayanti at the Railway Station Chowk | रेल्वे स्टेशन चौकात नेताजी जयंती

रेल्वे स्टेशन चौकात नेताजी जयंती

यवतमाळ : येथील रेल्वे स्टेशन चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. बाळासाहेब चौधरी मित्र मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मित्र मंडळातर्फे गेली ३० वर्षांपासून अव्याहतपणे जयंतीचा कार्यक्रम घेतला जातो.
नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हारार्पण करून वंदन केले. बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. देविसिंह परिहार परिवारातर्फे ३०० लोकांसाठी चहा-नाश्त्याची विनाशुल्क व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी दीपक ठाकूर, नरेश ठाकूर, नगरसेवक नंदू कुडमेथे, नगरसेविका अरुणा गावंडे, पंचायत समिती सभापती मंदा डेरे, प्रताप पारस्कर, अनंता जोशी, बाबारावजी ठाकरे, सुरेश जयसिंगपुरे, केनसिंह चव्हाण, संजय आकोलकर, गोविंद मेश्राम, अनिल पांडे, उद्धव बाकडे, हिरा मिश्रा, शंकरराव राऊत, रामेश्वर यादव, मधू गावंडे, गंधेवार, भोला चावला, भाऊ पिसे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Netaji Jayanti at the Railway Station Chowk