राष्ट्रीयीकृत बँकांनी त्वरित पीक कर्ज वाटप करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:43+5:302021-06-19T04:27:43+5:30

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे आमदार नामदेव ससाणे यांनी शुक्रवारी युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक, ...

Nationalized banks should disburse crop loans immediately | राष्ट्रीयीकृत बँकांनी त्वरित पीक कर्ज वाटप करावे

राष्ट्रीयीकृत बँकांनी त्वरित पीक कर्ज वाटप करावे

Next

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे आमदार नामदेव ससाणे यांनी शुक्रवारी युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर आदींना त्वरित कर्ज वाटपाच्या सूचना दिल्या.

जुन्या शेतकरी ग्राहकांसोबतच नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक लागवड करणे शक्य हाेईल. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा नवीन शेतकरी खातेदारांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली. त्यामुळे बँकांनी नवीन शेतकरी खातेदारांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी आमदार सासाने यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात लवकरच राष्ट्रीयीकृत बँकांना भेट देऊन कर्ज वाटप आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे.

===Photopath===

180621\img-20210618-wa0026.jpg

===Caption===

आमदार नामदेव ससाने यांचा पासपोर्ट फोटो

Web Title: Nationalized banks should disburse crop loans immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.