शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी बंडखोरीच्या तयारीत

By admin | Updated: August 18, 2014 23:48 IST

आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील

यवतमाळ : आघाडीच्या वाटाघाटीत यवतमाळ विधानसभा ही राष्ट्रवादीला सुटणार की नाही हे अजूनही निश्चित झाले नाही. काँग्रेस आपला दावा या मतदारसंघावर कायम ठेवणार असल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. हेवीवेट पदाधिकाऱ्याने गॉडफादरकडून बंडखोरीसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचा दावा केला आहे. तर बँक संचालकांनी एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट दिल्लीत संधान साधले आहे. जिल्हा मुख्यालयी असलेला यवतमाळ विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा मानला जातो. हा एकमेव मतदारसंघ ताब्यात असला की आपोआपच संपूर्ण जिल्ह्यात विस्तार करता येतो. पक्ष वाढीसाठीसुद्धा हा जिल्ह्याचा गड समजला जातो. या बाबी हेरूनच राष्ट्रवादीतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यवतमाळ विधानसभेवर दावा करत असताना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेतील सत्ता, पंचायत समितीतील सत्ता, नगरपरिषदेतील सत्ता याचा हवाला दिला जात आहे. शिवाय भाजप आणि काँग्रेसमधील असंतुष्टही राष्ट्रवादीच्या दिमतीला राहणार असल्याचा दावा केला जात आहे. आघाडीत हा मतदारसंघ मिळविण्यात यश आले नाहीतर वेळप्रसंगी बंडखोरी करण्याची तयारीही या हेवीवेट नेत्याने केली आहे. त्या अनुषंगाने सर्वांना संपर्क केला जात आहे. राष्ट्रवादीचा प्रमुख नेताच बंडखोरीच्या तयारीत असल्याचे पाहूण आता या पक्षातील अनेक जण हिच वाट निवडण्याच्या मानसिकतेते आले आहेत. काहींनी तर थेट पक्ष सोडून युतीत घरठाव करण्याची तयारी चालविली आहे. नेत्याच्या पावलावर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी पाऊल ठेवल्यास आगामी विधानसभेत आघाडी धर्म संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका काँग्रेसला अधिक बसेल. (कार्यालय प्रतिनिधी)