शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांनी हमी भावाचे आश्‍वासन पाळावे

By admin | Updated: May 15, 2014 02:25 IST

पांढरे सोने पिकविणार्‍या विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढ होत आहे.

विदर्भ जनआंदोलन समिती : शेतकर्‍यांच्या आशा पल्लवितयवतमाळ : पांढरे सोने पिकविणार्‍या विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील दहा वर्षात विदर्भातील सुमारे दहा हजार शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या संदर्भात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कृषीमूल्य आयोगाच्या सनदी अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले होते. कृषीमूल्य आयोगाने पिकांचे हमी भाव निश्‍चित करताना पिकाला येणारा खर्च, खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमतीत झालेल्या वाढीचा विचार करून याखेरीज शेतकर्‍याला शेतीची कामे आणि पीक गोळा करण्यासाठी लागणारी मजुरी, कर्जाचे व्याज याचा विचार करून यावर ५0 टक्के नफा जोडून पिकांचे हमी भाव निश्‍चित करण्याची घोषणा मोदी यांनी केली होती. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर त्यांनी हमी भावासंदर्भातील आश्‍वासन पाळावे, अशी मागणी एका प्रसिद्धी पत्रकातून विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केली आहे.निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यातच हमी भावासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना न्याय दिलेला नाही. जागतिकीकरणाच्या नावावर कापसाची आयात खुली केल्यामुळे २0 लाख गाठी २00४ मध्ये भारतात आल्या. यातूनच कापसाचे भाव पाडण्यात आले. परिणामी विदर्भामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे. हमी भावाच्या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरावी, अशी आशा विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आहे. मात्र त्यांनी घेतलेली ही भूमिका कितपत यशस्वी होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी विदर्भ जन आंदोलन समितीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. येणार्‍या सरकारने यावर तोडगा काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)