शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभाराने वीज ग्राहकांना मनस्ताप

By admin | Updated: October 24, 2016 01:12 IST

मारेगाव वीज वितरण कंपनी कार्यालयातून अनेक विद्युत ग्राहकांना चुकीची देयके येतात.

मारेगाव : मारेगाव वीज वितरण कंपनी कार्यालयातून अनेक विद्युत ग्राहकांना चुकीची देयके येतात. मीटरचे फोटो रिडींग घेऊनसुद्धा मीटरवरील रिडींग मागे अन् देयके धावती पुढे, अशी अवस्था बघायला मिळत आहे. ग्राहकांच्या नावात असंख्य चुका, ही बाब नित्याचीच झाली असताना देयकांवर वीज ग्राहकांचा चक्क पत्ताच बदलविला गेल्याने संबंधितांना देयकच मिळत नसल्याचा प्रकारसुद्धा मार्डी येथील एका वयोवृद्ध वीज ग्राहकांना देयकाबाबतीत घडला आहे.रशिद खॉ भुमेर खॉ पठाण रा.मार्डी यांचे मार्डी गावातच घर आहे. त्यांनी त्यांच्या घरी २००८ मध्ये वीज पुरवठा घेतला असून त्यांचा पूर्वीचा मीटर क्रमांक डी.एल.४२० असा आहे. बिलींग युनीटने आता नव्याने त्यांना ३७०९९०००११८१ असा ग्राहक क्रमांक दिला आहे. दर महिन्याला त्यांच्या मीटरचे रिडींगसुद्धा घेतले जाते. ते नियमीत बील भरतात. पण गेल्या एक वर्षांपासून त्यांना बिले मिळत नसल्याने ते कार्यालयात जावून बिले काढून बिलाचा भरणासुद्धा करतात. बिले का मिळत नाही, याबाबत चौकशी केली असता त्यांचे वीज देयकावरील त्यांचे नाव, ग्राहक क्रमांक सर्व बरोबर असताना गावात बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांच्या देयकावर मार्डी गाव न दर्शविता धामणी, धमाणी/वानी- ४४५३०४ असे नाव असल्याने त्यांच्या नावांची बिले वितरणासाठी धामणी गावात जात असावे व तेथूनच ते वाटप करणाऱ्यांच्या हस्ते कचऱ्यात जात असावे. म्हणून त्यांना बिले मिळत नव्हती. वीज देयकावरील चुकीच्या पत्त्यात दुरूस्ती करण्याची मागणी वृद्ध रशिद खॉ यांनी गेल्या एक वर्षापासून मारेगावच्या उपविभागीय अभियंत्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र अजूनही बिलातील चुक दुरूस्त करून देण्यास चालढकल केली जात आहे. वारंवार कार्यालयात जावून बिले काढणे शक्य नसल्याने बिलातील धामणी नाव कमी करून मार्डी गाव, अशी सुधारणा करूनच देयक द्यावी. अन्यथा आपण बिलच भरणार नाहीत व भविष्यात विद्युत पुरवठा खंडित केल्यास ग्राहक मंचात जावू, असा इशाराही पठाण यांनी संबंधित अभियंत्याला दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)