मोटारसायकल अपघात; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:29 IST2019-04-01T00:28:28+5:302019-04-01T00:29:09+5:30
तालुक्यातील गुळज येथील रहिवासी असलेले दोन युवक आपल्या दुचाकीवरून लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गावाकडे येत असताना नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपे जवळ अपघातात यातील एक युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे

मोटारसायकल अपघात; एक ठार, एक जखमी
गेवराई : तालुक्यातील गुळज येथील रहिवासी असलेले दोन युवक आपल्या दुचाकीवरून लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गावाकडे येत असताना नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपे जवळ अपघातात यातील एक युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे
गेवराई तालुक्यातील गुळज येथील संतोष मच्छिंद्र सारुक (वय २६), ज्ञानेश्वर आंधळे (वय २५) वर्षे हे दोघेजण चाकण येथील एका कंपनीमध्ये नोकरीस आहेत. दरम्यान यातील संतोष सारूक याचा विवाह एप्रिल महिन्यात २८ रोजी निश्चित करण्यात आला होता.
संतोष हा लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी शनिवारी मित्र ज्ञानेश्वर आंधळेसोबत हे गावाकडे आपल्या दुचाकीने (एम एच १४ एच एफ ६६३३) येत असताना नगर जिल्ह्यातील सुपा फाटा परिसरात एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे अपघातात संतोष सारूक हा जागीच ठार झाला. तर ज्ञानेश्वर आंधळे हा गंभीर जखमी झाला आहे.
संतोष याच्यावर गावातील स्मशानभूमीत शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.