शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
4
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
5
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
6
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
7
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
8
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
9
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
10
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
11
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
12
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
13
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
14
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
15
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
16
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
17
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
18
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
19
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
20
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर

बसमध्ये बाळाला जन्म देऊन आई पसार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:56 PM

सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.

ठळक मुद्देपांढरकवडा-यवतमाळ बसमधील प्रकार अवधूतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले मूल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका गर्भवतीने बसमध्येच बाळाला जन्म दिला. कोणाचेही लक्ष नाही याची खात्री करुन बाळ बसमध्येच सोडून ती पसार झाली.सोमवारी रात्री ७.३० च्या सुमारास पांढरकवडा आगाराची बस क्र. एमएच ०६-एस ८८२४ यवतमाळकरिता प्रवासी घेऊन निघाली. प्रत्येक थांब्यावरुन प्रवाशांची चढउतार होत होती. संध्याकाळ झाल्याने बसमधील लाईट बंद करण्यात आले. त्या अंधारातच एक गर्भवती प्रसूूत झाली आणि एका बाळाला जन्म दिला. पण गर्भवतीच्या प्रसूतीकळेचा जराही अंदाज बसमधील इतर प्रवाशांना आला नाही. महिलेने नवजात बाळाला बसमध्ये जन्म दिला. आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही याची खात्री करुन बाळाला बसमध्येच सोडून ती पसार झाली.सदर बस यवतमाळ बसस्थानकावर आली असता सर्व प्रवासी उतरले. त्या बाळावर एकाही प्रवाशाचे लक्ष गेले नाही. कामगिरी संपल्यामुळे वाहक खाली उतरायला निघाले तेव्हा त्यांच्या पायापर्यंत रक्त आलेले दिसले. तेव्हा त्याने बसमधील मागील आसनाखाली पाहिले. तेथे एक नवजात बाळ दिसले. बसस्थानकावर उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. बाळ मृतावस्थेत होते. यवतमाळ बसस्थानक प्रमुख उजवणे, सहायक वाहतूक निरीक्षक दिगांबर गावंडे, कर्मचारी जितेंद्र दवारे आणि सदर बसचे चालक-वाहक यांनी अवधुतवाडी पोलीस स्टेशन गाठून घटनेची कल्पना दिली. पोलीस लगेच बसस्थानकावर पोहोचले. पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी नवजात बालकाला ताब्यात घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी