शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक आत्महत्या ३१ ते ४५ वयोगटात

By admin | Updated: May 27, 2015 02:16 IST

जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. पंधरा वर्षात तीन हजार १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी ३१ ते ४५ वयोगटातील तब्बल एक हजार १२२ शेतकरी होते. या वयोगटातील शेतकऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडत असल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत असल्याने सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते ११ मे २०१५ पर्यंत ३१८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी एक हजार २२६ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून १९१९ प्रकरणे अपात्र ठरले आहे. शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने शेतकरी कुटुंंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा ताजा अहवाल विभागीय आयुक्तांना नुकताच सादर करण्यात आला असून त्यात आत्महत्येचे कारण, वयोगट, जातीनिहाय आत्महत्या, कर्जाची रक्कम आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते ३० वयोगटातील ७७६, ४६ ते ५५ वयोगटातील ६८८, ५५ ते ६५ वयोगटातील ३५१ आणि ६५ च्यावर वयोगटातील २०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच आत्महत्येच्या कारणांमध्ये सर्वाधिक कारण हे कर्जबाजारीपणा असल्याचे दिसून आले. ९२५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. तर दहा ते २५ हजार कर्ज असलेल्या ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. ४० हजाराच्या वर कर्ज असणाऱ्यांची संख्या ५०३ आहे. आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून सर्वेक्षणातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)