शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचा मोह सुटेना

By admin | Updated: August 18, 2014 23:48 IST

मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही

काँग्रेस जिल्हाध्यक्षांची प्रतिज्ञा हवेत : मुलाखतीसाठी पुन्हा हजर यवतमाळ : मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी येथे पत्रपरिषदेत केली होती. मात्र या प्रतिज्ञेवरून अद्याप तीन महिनेही लोटले नसताना कासावार स्वत:च काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या संसदीय समितीसमोर मुंबईत रविवारी हजर झाले. यावरून कासावारांना आमदारकीचा मोह सुटता सुटत नसल्याचे सिद्ध होते. वामनराव कासावार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उघड बंड पुकारले होते. या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन कासावार यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोबतच विद्यमान मंत्री-आमदार किंवा त्यांच्या मुलांना पक्षाने पुन्हा काँग्रेसचे तिकीट देऊ नये, अशी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत दोन दिवसांनी वामनराव कासावार यांनी पत्रपरिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे, तर यापुढे मी किंवा माझा मुलगा वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, अशी प्रतिज्ञा कासावार यांनी पत्रकारांसमक्ष घेतली होती. या घोषणेवरून अवघे काही दिवस लोटत नाही तोच वामनराव पुन्हा आमदारकीसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या या घोषणेचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वणीमध्ये काही दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांकडून मुलाखती झाल्या. तेव्हा कासावार स्वत: तेथे उपस्थित नव्हते. परंतु आपल्याशिवाय कुणी दावेदारी करणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. तीनही तालुक्यातून त्यांचेच नाव पुढे केले गेले. आता रविवारी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीपुढे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हासुद्धा वणी विधानसभा मतदारसंघातून वामनराव कासावार एकटेच मुलाखतीला सामोरे गेले. ते पाहता वामनरावांच्या घोषणेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)