संजय राठोड यांना बदनाम केले जात आहे; शिवसेनेकडून यवतमाळमध्ये भाजपाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:58 IST2021-02-16T17:58:35+5:302021-02-16T17:58:42+5:30
शहरातून महिला-पुरुषांच्या सहभागात मोर्चा काढण्यात आला.

संजय राठोड यांना बदनाम केले जात आहे; शिवसेनेकडून यवतमाळमध्ये भाजपाचा निषेध
नेर/दिग्रस (यवतमाळ) : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर करून वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मंगळवारी नेर येथे भाजपचा निषेध नोंदविला. शहरातून महिला-पुरुषांच्या सहभागात मोर्चा काढण्यात आला.
विविध प्रकारच्या घोषणा मोर्चेकरी देत होते. तहसील कार्यालयावर धडकलेल्या मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. दिग्रस येथेही शिवसैनिकांनी मोर्चा काढला. शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.