शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अंबिकानगरातील युवकाचा आयटीआयसमोर खून

By admin | Updated: November 10, 2016 01:29 IST

जुन्या वैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने भरदिवसा सायंकाळी ५ वाजता खून करण्यात आल्याची घटना

जुने वैमनस्य : बाभूळगाव तालुक्यातून दोघांना अटक यवतमाळ : जुन्या वैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने भरदिवसा सायंकाळी ५ वाजता खून करण्यात आल्याची घटना येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतकाचे नाव सुनील ऊर्फ वट्ट्या गोविंद पवार (२२) रा.अंबिकानगर असे आहे. सुनीलवर तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला. यावेळी हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या खुनामागील नेमके कारण स्पष्ट होवू शकले नाही. मृतक हासुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याची चर्चा होती. यातील दोन आरोपींना पकडण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. यामध्ये दुर्गेश विठ्ठल कडू (१८) रा. धामणगाव रोड व रिंकू अजय रामटेके (१८) रा. पाटीपुरा या दोघांचा समावेश आहे. या दोनही आरोपींना बाभूळगाव तालुक्यातील सुकळी पार्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोनही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. या खुनातील मुख्य सूत्रधार हा रिंकू रामटेके असून यापूर्वी तो प्रणय खोब्रागडे याच्या खून प्रकरणात पोलिसांना हवा होता. तसेच दुर्गेशवर देखील पोलिसात गुन्हे दाखल आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा शोध सुरू केला. त्यातून त्यांना आरोपींचे लोकेशन हे बाभूळगाव असल्याचे कळले. या दोघांना पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, अमोल माळवे यांच्यासह शकील, गजानन डोंगरे, हरीश राऊत, प्रदीप नाईकवाडे, गणेश देवतळे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)