शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार महासंघाची सभा

By admin | Updated: September 29, 2016 01:15 IST

बारा बलुतेदार महासंघाची सभा येथे घेण्यात आली. यावेळी अमरावती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके,

यवतमाळ : बारा बलुतेदार महासंघाची सभा येथे घेण्यात आली. यावेळी अमरावती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके, विभागीय सचिव संतोष मोतेवार, उपाध्यक्ष प्रकाश क्षीरसागर, संघटक संजय चुनारकर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम, शहर अध्यक्ष राजेश रेकलवार प्रामुख्याने उपस्थित होते. न्हावी, धोबी, शिंपी, लोहार, कुंभार, बेलदार, कलार, परिट, सोनार, सुतार, गोसावी, गुरव, साडी रंगारी, पिंजारी या बारा बलुतेदार समाजाची परिस्थिती स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही दयनीय आहे. त्यांचा आर्थिक, शैक्षणिक तसेच सामाजिक विकास झालेला नाही. ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाचा पाव भागही बारा बलुतेदारांच्या वाट्याला येत नाही. ओबीसींसाठी असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचाही फायदा होत नाही. या बाबीला शासन व्यवस्था जबाबदार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडले. बारा बलुतेदार महासंघाच्या छताखाली सर्व जातींनी एक व्हावे, असे आवाहन विदर्भ विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके यांनी यावेळी केले. या सभेत यवतमाळ शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली. शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी राजेंद्र गिरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्ष नरेश काळे, हरिश मांडवकर, सहसचिव दिलीप करमिलकर, सुनील घडीनकर, शहर संघटक ज्ञानेश्वर बागडे, गुरुदेव कोसरे यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल अतकर, ज्ञानेश्वर मेसेकर, रूपेश खरवडे, चंद्रशेखर केवतकर, अनिल घेनावत, प्रवीण वनस्कर, किशोर दुलरवार, मनिष महागमकार, योगेश रेकलवार, ज्ञानेश्वर बागडे, अमोल खोबरकर, आप्पाराव हळदकर, संजय चलकेलवार, शंकर पोटपल्लीवार, प्रभाकर पिल्लेवार, विजय गोविंदवार, पुरुषोत्तम मादेश्वर, मनोहर रेकलवार, गजानन लिंगनवार यांची नियुक्ती झाली आहे. सभेचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष राजू रेकलवार, संचालन जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम यांनी, तर आभार चंद्रशेखर केळतकर यांनी मानले. (वार्ताहर)