शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

पुसद येथे मेडिकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 11:44 IST

तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

पुसद (यवतमाळ) : एमबीबीएस तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने इसापूर धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

परिक्षित पंजाबराव चंद्रवंशी (२२, रा. भाग्यनगर, पुसद) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मागील चार-पाच दिवसांपूर्वीच त्याचा द्वितीय वर्षाचा निकाल लागला. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. सुटी असल्याने काही दिवसांपासून परिक्षित पुसद येथे आपल्या घरी राहत होता.

सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तो घरी काहीही न सांगता दुचाकीने निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्याचे शेवटचे मोबाइल लोकेशन इसापूर धरण येथे मिळाले. परिक्षितने अंचुळेश्वर मार्गाने इसापूर धरण गाठले. तेथे दुचाकी एका झुडपात फेकून त्याने धरणात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थीpusad-acपुसद