शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

‘मेडिकल’मध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त मुलीला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजाला हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस हा मेंदूज्वराचा आजार असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देसंयुक्त प्रयत्नांना यश : हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिसचा उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या १३ वर्षाच्या मुलीला दाखल करण्यात आले. ३ फेब्रुवारीला ही मुलगी रुग्णालयात आली. प्रथम तिला मेंदूज्वराचे लक्षण (हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस) आढळले. मात्र तिची प्रकृती खालवतच जात होती. अखेर डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त करून तिला पूर्णत: बरे केले.पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजाला हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस हा मेंदूज्वराचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराचा विषाणू थेट मेंदूवर आघात करत असल्याने रुग्णाच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. परिस्थिती लक्षात घेऊन मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शेखर घोडेस्वार यांनी विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांच्या मार्गदर्शनात एक चमू तयार केली. त्यामध्ये सहायक प्रा.डॉ. चंद्रशेखर धुर्वे, डॉ. राम मुरकुट, डॉ. आशीष कुसरे, डॉ. अब्दुल पाटणकर यांचा समावेश केला. या चमूने पूजावर उपचार सुरू केले. तिला अँटी व्हायरल ड्रगची आवश्यकता होती. तसे मागणीपत्र प्रशासनाकडे पाठविण्यात आले.अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी स्थानिकस्तरावर ही औषधी खरेदी करण्यास तत्काळ परवानगी दिली. तातडीच्या उपचारामुळे व नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स यांनी घेतलेल्या काळजीमुळे पूजाला जीवनदान मिळाले. ती ठणठणीत बरी होऊन १६ फेब्रुवारी रोजी आपल्या गावी परत गेली.

टॅग्स :Healthआरोग्य