शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे शिवपर्वात भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग संस्थेच्या प्रांगणात शिवपर्वाचे आयोजन तसेच १९ फेब्रुवारीला ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपूजन, श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली व शोभायात्रा निघणार आहे.

ठळक मुद्देलक्षवेधक शोभायात्रा : मोटरसायकल रॅली, वैचारिक प्रबोधाची मेजवाणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसदच्यावतीने ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान शिवपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे पर्व साजरे होत आहे.राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग संस्थेच्या प्रांगणात शिवपर्वाचे आयोजन तसेच १९ फेब्रुवारीला ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपूजन, श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली व शोभायात्रा निघणार आहे.११ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते शिवपर्वाचे उद्घटन होणार आहे. अध्यक्षस्थानी भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.आप्पाराव मैंद राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड.नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार अ‍ॅड.अनंतराव देवसरकर, डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, नगराध्यक्ष अनिता नाईक उपस्थित राहणार आहे.शिवपर्वात १२ फेब्रुवारीला ‘संतांचे विचार आजच्या काळाची गरज’ या विषयावर हभप मधुकर महाराज बारुळकर यांचे व्याख्यान, १३ ला ‘लढाया पलिकडील शिवराय’ या विषयावर डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान, १४ ला ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजची लोकशाही’ गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान होणार आहे. १५ ला ‘छत्रपती शिवराय द ग्रेटेस्ट सोअर्स आॅफ मार्इंड पॉवर डेव्हलपमेंट’ या विषयावर कोल्हापूर येथील डॉ.विठल कोतेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. १६ ला शाहीर डॉ.राजीव चव्हाण हे शाहिरी जलसा सादर करणार आहेत. १७ फेब्रुवारीला राजमाता जिजाऊ चित्रपटाच्या अभिनेत्री प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख यांचे ‘जिजाऊंचे विचार आणि आजच्या काळाची गरज’ या विषयावर महिलांना प्रबोधन करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग परिसरात होत आहे.पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यरत छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ.गणेश पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड.भारत जाधव, उपाध्यक्ष शेख कयूम, प्रवीण कदम, सचिव नितीन पवार, सहसचिव सुरेश धनवे, कोषाध्यक्ष अमोल व्हडगिरे, शिवपर्व प्रमुख राजू साळुंके, शोभायात्रा समिती प्रमुख अजय क्षिरसागर, शिवसामान्य स्पर्धा प्रमुख चंद्रकांत ठेंगे, मोटारसायकल रॅली प्रमुख अभिजित पानपट्टे आदींनी केले आहे.