शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार नागरिकांना मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे.

ठळक मुद्देदारव्हा पंचायत समितीचा पुढाकार : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील ५० हजारांवर नागरिकांना मास्कचे मोफत सुरक्षा कवच देण्याचा निर्णय पंचायत समितीने घेतला. त्यानुसार ३० हजार मास्क तयार झाले आहे.गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. बचत गटामार्फत मास्क तयार करण्यात येत असून इतर उपाययोजना व गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या खोकला, शिंकण्याने संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.मास्कचे महत्त्व लक्षात घेता पंचायत समितीने नागरिकांना शक्य तेवढे मास्क पुरविण्याचा निर्णय घेतला. यासाठी १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची तरतूद केली. ग्रामपंचायतीने कापड व इलास्टीकचा पुरवठा करून महिला बचत गटाकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका व्यवस्थापन कक्षांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १६७ महिला बचत गटांतील २०० महिला या कामी योगदान देत आहे. तसेच दुसऱ्यांदा गावागावात घाणीच्या ठिकाणी, रस्त्याच्याकडेला, नालीवर किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. गावातील दिव्यांगांना अन्नधान्य, सॅनिटायजर, साबण यासह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी घेऊन ग्रामपंचायतीमार्फत इतर उपाययोजना व उपक्रम राबविले जात आहे.नियमांचे पालन करणे आवश्यककोरोना आजार आणि त्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी लक्षात घेता ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याउपरही काही अडचण असल्यास ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बीडीओ राजीव शिंदे यांनी केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या