शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम  केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश : दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते ५, आठवड्याच्या अखेरीस पुन्हा एक दिवस संचारबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी गेले आठ दिवस बाजारपेठेवर निर्बंध लावले गेले होते. रविवारी संपूर्ण संचारबंदी पाळल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम  केले आहेत. सोमवारच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत हे निर्बंध राहतील. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवार सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. मागील आठवड्यात निर्बंध घातल्यानंतरही कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता हे आदेश शहरी व ग्रामीण भागासाठी ८ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून यवतमाळसह सोळाही तालुका पातळीवर नागरिक स्वयंस्फूर्तपणे निर्बंधांचे पालन करताना दिसत आहे. यापूर्वी अत्यंत कठोर लाॅकडाऊनमधील नुकसान नागरिकांंनी सोसले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन पेक्षा सध्याचे कठोर निर्बंध पाळून व्यवहार सुरळीत ठेवण्याकडे नागरिकांचा कटाक्ष आहे. 

व्यापारी म्हणतात, दुकानांची वेळ वाढवा  जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा मर्यादित केल्या आहेत. मात्र यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ ऐवजी किमान ७ वाजतापर्यत वाढविण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. प्रामुख्याने शहरातील नोकरदार वर्ग हाच मोठा ग्राहक आहे. या मंडळींची कार्यालये सुरू राहणार आहे. त्यामुळे ५ वाजताच्यानंतरच त्यांना खरेदीसाठी वेळ राहणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दुकानांच्या वेळा ७ वाजतापर्यंत वाढविण्याची मागणी यवतमाळ शहरातील व्यापारी मंडळींनी केली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी