बाजार समितीच्या निवडणुका आॅगस्टमध्ये

By Admin | Updated: May 29, 2015 00:11 IST2015-05-29T00:11:56+5:302015-05-29T00:11:56+5:30

जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळ न्यायालयात गेले होते.

Market Committee elections in August | बाजार समितीच्या निवडणुका आॅगस्टमध्ये

बाजार समितीच्या निवडणुका आॅगस्टमध्ये

यवतमाळ : जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संचालक मंडळ न्यायालयात गेले होते. यानंतर काही काळ प्रशासक होते. आता निवडणुकीची तयारी करण्यासाठी सहकार विभागाने हिरवा कंदील दिला आहे. ३१ मे पर्यंत मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
आॅगस्टमध्ये या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, नेर आणि वणी बाजार समितीचा कार्यकाळ संपला होता. यातील काही बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त होते. प्रशासक १२ महिने काम पाहू शकतात. त्यानुसार १३ महिन्याचा कालावधी प्रशासकाने हाताळला आहे. आता सहकार विभागाने निवडणूक घेण्यासाठी प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
३१ मे पर्यंत मतदार यादीचे प्रारुप प्रसिध्द करावे लागणार आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या मतदार यादीत व्यापारी, अडते, परवानाधारक, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समित्यात शेतमालाची मोठी उलाढाल होते. या संस्था ताब्यात घेण्यासाठी चढाओढ राहणार आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Market Committee elections in August