शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बंधनकारक; न शिकवणाऱ्या इंग्रजी शाळांना होणार लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

प्राथमिक शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय उपसंचालकांना निर्देश दिले आहेत. त्यावरून जिल्ह्यातील इंग्रजी शाळाही अलर्ट झाल्या आहेत. ज्या इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करावा व तसा प्रस्ताव संचालनालयाकडे सादर करावा, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या काळाच्या गरजेनुसार इंग्रजी आवश्यक असली तरी महाराष्ट्रात मराठी तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शाळा यातून पळवाटा शोधतात. आता शिक्षण विभागाने अशा शाळांना चक्क एक लाखांचा दंड ठोठावण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय उपसंचालकांना निर्देश दिले आहेत. त्यावरून जिल्ह्यातील इंग्रजी शाळाही अलर्ट झाल्या आहेत. ज्या इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करावा व तसा प्रस्ताव संचालनालयाकडे सादर करावा, असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. 

इंग्रजी शाळांतील मुले मराठीत ढ

पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमात घेणारे हुशार विद्यार्थीही व्यवहारात मराठी बोलताना मागे पडतात. हा दैनंदिन अनुभव आहे. मात्र शासनाने शाळांना दंड करण्यापेक्षा अमलबजावणीवर लक्ष द्यावे. नियमित आढावा घेतल्यास मराठीचे अध्यापन होईल.        - राजेंद्र वाघमारे, दिग्रस

विद्यार्थ्यांना मराठीच्या अंकांचीही ओळख नसल्याने अनेकदा व्यवहारात अडचणी येतात. त्यामुळे मराठी सक्तीची करणे बरोबरच आहे. त्यामुळे मराठी भाषेचे महत्व बालवयातच पटल्याने दैनंदिन व्यवहारातही पुढील पिढी मराठीचा वापर करेल.    - सुरेश पेंढरवाड, वणी

शिक्षक, पालक सर्वांकडून स्वागत

- इंग्रजी शाळांमध्येही मराठी भाषेचे अध्यापन व्हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबतचा निर्णयही झालेला असताना शाळांकडून केवळ काही तासिका वेळापत्रकात ठेवून बनाव केला जात होता. मात्र आता आर्थिक दंड करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे पालकांसह मराठी प्रेमी शिक्षकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 

मराठी शिकविली जात नसल्यास करा तक्रार- राज्य सरकारने ‘महाराष्ट्र मराठी भाषा शिकणे आणि शिकविणे कायदा-२०२०’ संमत केला आहे. त्यामुळे याबाबत टाळाटाळ करणाऱ्या शाळांची पालकांना तक्रार करता येणार आहे. 

नियमित पाहणी करणारमराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. त्यामुळे प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. शाळेत मराठी शिकलेल्या विद्यार्थ्याला पुढे अनेक संधी उपलब्ध असतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही नियमित शाळांची पाहणी करणार आहो. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :Educationशिक्षण