शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूजींच्या यवतमाळ भेटीने अनेकांना हक्काची शेतजमीन

By admin | Updated: November 13, 2014 23:09 IST

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला.

भूदानाच्या जमीनीचे वाटप यवतमाळ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला. चाचा नेहरूंची भेट यवतमाळकरांसाठी कायम मनात घर करून गेली. या ऐतिहासीक स्थळाला यवतमाळकरांनी कायम जपले आहे.विनोबा भावे यांनी भुदान चळवळ जिल्ह्यात राबविली. या चळवळीला गावा गावातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जमिनदार आणि मोठया आसामिंनी भुदान चळवळीत जमीनी दान दिल्या. एक लाख ३७ हजार एकर शेतजमीन विनोबाजींना दानपत्रातुन मिळाली. मिळालेल्या जमीनीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप कोणाच्या हस्ते करायचे याबाबत चर्चा झाली, अखेर देशाच्या पंतप्रधानांना बोलविण्यावर सर्वांचे एकमत झाले.या सोहळयाकरिता गोदनी मार्गावरील खुल्या मैदानाची निवड करण्यात आली. सध्याच्या आकाशवाणी केंद्राच्या लगत १८ एप्रिल १९५९ रोजी ही सभा घेण्यात आली. याकार्यक्रमाला पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी नेहरूजींची सभा झाली. ेया सभेत भूमीहीनांना जमीनीचा हक्क देण्यात आला. भुदान यज्ञ मंडळ त्यावेळी नियुक्त करण्यात आले. यामुळे भूमीहीन कुटुंबासाठी हा दिवस सुवर्णमयी होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सभेत झालेले राष्ट्रसंतांचे हे भजन यवतमाळकरांसाठी अजरामर ठरले आहे. हा दिवस जिल्ह्यासाठी अविस्मरणीय असाच होता. त्याची नोंद नगर परिषदेच्या दप्तरी करण्यात आली आहे. या क्षणाची आठवण जपण्यासाठी ऐतिहासीक वास्तु म्हणून उद्यान उभारण्यात आले. गोदनी मार्गावरचे उद्यान आजही अनेकांचे लक्ष वेधुन घेते. येथील भिंतीवर भुदान सभेच्या क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे. सोबत मनाला प्रसन्न करणारे उद्याण उभारण्यात आले आहे. हे स्थळ आजही पंडितजींच्या यवतमाळ भेटीची आठवण करून देते. (शहर वार्ताहर)