शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी अनेकांची पक्षांतराची तयारी

By admin | Updated: October 22, 2016 01:47 IST

नगरपरिषदेसाठी आरक्षण आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर होताच अनेकांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

नगरपरिषद निवडणूक : मतदारांच्या भेटीगाठींचा जोर वाढलाउमरखेड : नगरपरिषदेसाठी आरक्षण आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर होताच अनेकांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्तेसाठी पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याच्याही वाटेवर अनेक जण आहेत. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा आदींसह सर्वच पक्षातील व अपक्ष इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी पक्की समजून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत सर्वत्र नगरपालिका निवडणुकीचे वातावरण व चर्चा दिसत होती. यावर्षी नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. अनुसूचित जातीसाठी उमरखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद राखीव असल्याने यावेळी जास्त स्पर्धा राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला शांत असलेले वातावरण चार दिवसांपासून तापले आहे. त्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते व अपक्षही कामाला लागले आहेत. नगराध्यक्षांची निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली आहे. शहरातील दसरा, नवरात्र, शारदोत्सव आदी मंडळाला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जुन भेट दिली. यातून जनसंपर्क वाढविण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. दिवसभर प्रत्येक घरी कुठल्या ना कुठल्या पक्षाचा उमेदवार भेट देत आहे. शहरातील मंदिर, वाचनालय, हॉटेल, पानटपरी, दुकाने, दवाखाना यासह अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवार मतदारांच्या संपर्कासाठी उपस्थिती लावत आहे. छोटे-मोठे समारंभ, घरगुती कार्यक्रम, निधन आदी कार्यक्रमातही नगराध्यक्षांसह सर्वच संभाव्य उमेदवार उपस्थित राहत आहे. (शहर प्रतिनिधी)