शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुलेंचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

‘महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन’ या विषयावर डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील मजकूर आज जगात गाजतो आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही. त्या देशातील शिक्षण व्यवस्था खालावली की तो देश आपोआप नष्ट होतो.

ठळक मुद्देप्रभाकर गायकवाड : फुले-आंबेडकर स्मृती पर्वात व्याख्यान, माळी समाजाच्या संयोजनात कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजक्रांतीचे अग्रणी महात्मा फुलेंचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अपूर्व आहे. स्त्रिया आणि उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व दिले. स्वत:च्या कष्टातून शाळा स्थापन केल्या. मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जाणून त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे भारतात शिक्षक दिन म्हणून महात्मा फुले यांची जन्मतिथी वा पुण्यतिथीच योग्य आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत प्रा.डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी केले.येथील आझाद मैदानात महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्व आयोजित करण्यात आले. यात गुरुवारी माळी समाजाच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सत्यशोधक स्टडी सर्कलचे अध्यक्ष प्रा.दीपक वाघ अध्यक्षस्थानी होते.‘महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन’ या विषयावर डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील मजकूर आज जगात गाजतो आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही. त्या देशातील शिक्षण व्यवस्था खालावली की तो देश आपोआप नष्ट होतो. आपली आजची शिक्षण व्यवस्था ही अशीच आहे.आदर्श शिक्षक निवडताना त्याचे चारित्र्य तपासले जाते. हा निकष राधाकृष्णन यांना लावला गेला नाही. आपला जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा, अशी स्वत: राधाकृष्णन यांची इच्छा होती. म्हणूनच एकाच दिवशी मागणी, प्रस्ताव आणि मंजुरी मिळून ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आमच्यावर लादण्यात आला आहे. जातीव्यवस्था निसर्गनिर्मित आहे, असे त्यांचे तत्त्वज्ञान पोकळ होते. म्हणूनच शिक्षणात खऱ्या अर्थाने योगदान देणाºया महात्मा फुलेंचा सन्मान झाला पाहिजे, असे डॉ.गायकवाड यांनी ठामपणे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन अमर तांडेकर, कल्पना लंगडे यांनी केले. प्रास्ताविक सविता हजारे यांनी, तर आभार मोहन लोखंडे यांनी आभार मानले.आज तेली महासंघ व जमात-ए-इस्लामी हिंदचे संयोजनस्मृती पर्वात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तेली समाज महासंघाच्या संयोजनात व्याख्यान होणार आहे. ‘परिवर्तनाची विचारधारा स्वीकारून सामाजिक, आर्थिक व राजकीय उत्थान : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होईल. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक शिरभाते अध्यक्षस्थानी राहतील, तर संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांचे बीजभाषण होईल. याच दिवशी रात्री ८.३० वाजता जमात-ए-इस्लामी (हिंद) यवतमाळ यांच्या संयोजनात ‘भारत के बहुजन समाज की चुनौतियाँ और समाधान’ या विषयावर वाजीत कादरी यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संयोजकांतर्फे करण्यात आली आहे.