महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बस स्थानकावर होमहवन आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 19:26 IST2018-11-19T19:23:42+5:302018-11-19T19:26:33+5:30
अनेक दिवसापासुन बस स्थानकाचा विकास व्हावा यासाठी सातत्याने नागरीकांची मागणी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बस स्थानकावर होमहवन आंदोलन
यवतमाळ : बस स्थानकावर आलेली पिडा टळुन विकास व्हावा, यासाठी मनसेचे आज होम हवन करीत अभिनव आंदोलन करुन शासनाचा निषेध करन्यात आला. गेल्या अनेक दिवसापासुन बस स्थानकाचे काम रखडले आहे. यामुळे प्रवाश्यांनासुध्दा मोठा त्रास सहन करावा लागतो. बसस्थानक परीसरात स्वच्छता नाही, पुरेश्या सुविधा नाहीत. बस स्थानकात आतमध्ये जातानासुध्दा त्रास होतो. पावसाळ्यात संपुर्ण भागात पानी भरलेले असते. यासाठी अनेक दिवसापासुन बस्थानकाचा विकास व्हावा यासाठी सातत्याने नागरीकांची मागणी आहे.
यावेळी आंदोलनाला जिल्हा उपाध्यक्ष गजानन भालेकर, तालूकाध्यक्ष सचिन येलगंधेवार, शहराध्यक्ष राहुल ढोरे ,संदिप गाडगे,कपिल ठाकरे,नाना राऊत,दिपक बोरकर,पंकज रत्ने,सुरज राठोड,संजय बोक्से,मोहन ठाकरे आदी मनसे चे पदिधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते.